Join us

अग्निशमन दलाकडून पालिकेला घरचा अहेर

By admin | Published: February 11, 2016 3:49 AM

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीप्रकरणी माफिया व बिल्डर लॉबीला दोषी ठरविणाऱ्या पालिका प्रशासनाला अग्निशमन दलानेच घरचा अहेर दिला आहे़ या डम्पिंग ग्राउंडमध्ये

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीप्रकरणी माफिया व बिल्डर लॉबीला दोषी ठरविणाऱ्या पालिका प्रशासनाला अग्निशमन दलानेच घरचा अहेर दिला आहे़ या डम्पिंग ग्राउंडमध्ये आत जाण्यास जागा शिल्लक नसल्याने आगीचा बंब पोहोचण्यात अडथळा निर्माण झाला़ त्यामुळेच आग वाढत गेल्याचे अग्निशमन दलाने अहवालात स्पष्ट केले आहे़गेल्या दोन आठवड्यांपासून देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचरा पेटत आहे़ यामुळे देवनार परिसरातीलच नव्हे तर पूर्व उपनगरातील रहिवाशांचाही जीव गुदमरू लागला आहे़ वारंवार लागणाऱ्या या आगीमागे भंगार माफिया असल्याचा आरोप होत आहे़ मात्र ही आग लावली अथवा लागली तरी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या आतपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत़ देवनार डम्पिंग ग्राउंडकडे जाणारे रस्तेच कचऱ्याने भरले असल्याने त्या ढिगाऱ्यावरूनच गाडी चालविणे अग्निशमन दलास भाग पडले़ पाण्याचे टँकरही घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत़ मिथेन वायूमुळे आग पसरत गेली, हे एक कारण असले तरी आग वाढत जाण्यास आतमधील रस्त्यांवरील कचऱ्याचा ढीग कारणीभूत असल्याचे अग्निशमन दलाने निदर्शनास आणले आहे़ (प्रतिनिधी)झोपडीमाफियांवर केली कारवाईदेवनार डम्पिंग ग्राउंडच्या संरक्षक भिंतीलगतच बेकायदा झोपड्या बांधून माफिया विकत असतात़ असे पाच बेकायदा गाळे तयार होत असल्याची तक्रार पालिकेकडे आल्यानंतर त्यावर बुधवारी कारवाई करण्यात आली़ या गाळ्यांसमोरील संरक्षक भिंत तोडून टाकण्यात आली़ त्यावेळी या गाळ्यांमध्ये कचरा संकलनाचे बेकायदा गोदाम तयार करण्यात आले असल्याचे दिसून आले़ ३० बाय १५ फुटांचे हे गाळे व दीडशे बेकायदा झोपड्याही या वेळी पाडण्यात आल्या़देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचरा पुन:प्रक्रियेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने ३६ कोटी रुपये मिळाल्याशिवाय जागा सोडणार नाही, असा इशारा पालिकेला दिला आहे़ हा खर्च ४५ दिवसांमध्ये पालिकेने चुकता न केल्यास न्यायालयात खेचण्याची ताकीदच तत्त्व ग्लोबल एन्व्हायर्नमेंट लि़ यांनी पालिकेला दिली आहे़