अग्निशमन दलाचा उपाहारगृहांना दणका!

By Admin | Published: October 30, 2015 12:41 AM2015-10-30T00:41:18+5:302015-10-30T00:41:18+5:30

कुर्ला पश्चिमेकडील सिटी किनारा हॉटेलमध्ये घडलेल्या दुर्घटनेत आठ निष्पाप जिवांचा बळी गेला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेसह अग्निशमन दलाने नियम धाब्यावर बसविणाऱ्या

Fire Brigade House | अग्निशमन दलाचा उपाहारगृहांना दणका!

अग्निशमन दलाचा उपाहारगृहांना दणका!

googlenewsNext

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील सिटी किनारा हॉटेलमध्ये घडलेल्या दुर्घटनेत आठ निष्पाप जिवांचा बळी गेला आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेसह अग्निशमन दलाने नियम धाब्यावर बसविणाऱ्या उपाहारगृहांना दणके देण्यास सुरुवात केली. दोन आठवड्यांत उपाहारगृहांवर करण्यात आलेल्या कारवाईद्वारे आतापर्यंत १ हजार ३६ अनधिकृत सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत आणि आता याच कारवाई अंतर्गत सर्व उपाहारगृहांच्या प्रवेशद्वारावर उपाहारगृह अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असल्याबाबतचा फलक ठळकपणे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईसह उपनगरातील उपाहारगृहांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे सुधारित मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धती तातडीने अमलात आणण्यात आली आहे. यामध्ये अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यपद्धती टप्पेवार, सुलभ व काल सुसंगत करण्यात आली आहे. शिवाय उपाहारगृहात गॅस सिलिंडर्स किती असावेत? कसे ठेवावेत? याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील सर्व उपाहारगृहांच्या प्रवेशद्वारावर उपाहारगृह अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असल्याबाबतचा फलक ठळकपणे लावण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. उपाहारगृहांमध्ये खाद्यपदार्थ, पेयपान आदींचा आस्वाद घेणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता जपली जावी, अग्निसुरक्षा अधिकाधिक परिपूर्ण असावी, याकरिता यासंदर्भातील पावले उचलण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे अग्निशमन दलाद्वारे सुधारित मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धती तातडीने अमलात आणण्यात येत आहे. या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या सुधारणा तातडीने व्हाव्यात, यासाठी सूचनांची माहिती उपाहारगृहांच्या संघटनांना कळविण्यात येत आहे. त्याचबरोबर गॅस (एल.पी.जी./पी.एन.जी.) पुरवठादार कंपन्यांनादेखील सुधारित सूचनांची माहिती कळविण्यात येत आहे. शिवाय अंमलबजावणीबाबत कंपन्यांचेही सहकार्य घेण्यात येत आहे, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)
१के/पूर्व, आर/ दक्षिण, आर/मध्य व आर/उत्तर विभागांतील विविध उपाहारगृहांवर गुरुवारी कारवाई करून गॅस सिलिंडर्स, शेगड्या व टेबल खुर्च्या, ओव्हन, इलेक्ट्रिक शेगडी इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.२न्यू मरोळ उपाहारगृहातील ४ सिलिंडर्स जप्त करण्यात आले. मरोळ उपाहारगृहातील १ सिलिंडर, नागरदास मार्गावरील सर्वोदय उपाहारगृहातील ७ सिलिंडर्स, मालवणी उपाहारगृहातील १ सिलिंडर जप्त करण्यात आले. तसेच चायना डिलाइट उपाहारगृहावर कारवाई करण्यात आली.३आर/दक्षिण विभागात १२ उपाहारगृहांवर केलेल्या धडक कारवाईमध्ये ८ सिलिंडर्स, २ लाकडी बाकडे, २ लोखंडी बाकडे, ४ आयर्न शेगड्या जप्त करण्यात आल्या. तसेच पदपथावरील अनधिकृत शेडही पाडण्यात आले.४आर/मध्य विभागात ११ उपाहारगृहांवर केलेल्या धडक कारवाईमध्ये १६ सिलिंडर्स जप्त करण्यात आले. आर/उत्तर विभागात १० उपाहारगृहांवर केलेल्या कारवाईमध्ये १५ सिलिंडर्स, ३६ टेबल व खुर्च्या तसेच ९ शेगड्या व भांडी जप्त करण्यात आली.

Web Title: Fire Brigade House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.