कमला मिल अग्नितांडवा प्रकरणी फायर ब्रिगेडचा अधिकारी, हुक्का कंपनीच्या मालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 10:36 PM2018-01-20T22:36:01+5:302018-01-20T22:37:25+5:30

कमला मिल अग्नितांडवा प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. कमला मिलचा संचालक भंडारी, हुक्का कंपनीचा मालक निर्वाण पांडे आणि एका फायर ब्रिगेडच्या अधिका-याला अटक करण्यात आली आहे.

Fire brigade officer, hookah company owner arrested in Kamla Mill firenandwa case | कमला मिल अग्नितांडवा प्रकरणी फायर ब्रिगेडचा अधिकारी, हुक्का कंपनीच्या मालकाला अटक

कमला मिल अग्नितांडवा प्रकरणी फायर ब्रिगेडचा अधिकारी, हुक्का कंपनीच्या मालकाला अटक

googlenewsNext

मुंबई - कमला मिल अग्नितांडवा प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. कमला मिलचा संचालक भंडारी, हुक्का कंपनीचा मालक निर्वाण पांडे आणि एका फायर ब्रिगेडच्या अधिका-याला अटक करण्यात आली आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी मोजोस बिस्ट्रो पबचा सहमालक युग तुली याला अटक करण्यात आली होती. एन.एम.जोशी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली होती. कमला मिल आग दुर्घटनेनंतर युग तुली हा फरार झाला होता. आतापर्यंत एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत 14 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता.  

14 जणांचा गुदमरुन मृत्यू   
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत ११ तरुणींसह १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री (28 डिसेंबर 2017 ची घटना) ही दुर्घटना घडली. इमारतीतील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या अग्नितांडवामध्ये २४ महिलांसह ५४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पबमालक अभिजित मानकर, रितेश संघवी, जिगर संघवी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेतले आहे. तर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिकेच्या पाच अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.  

कमला मिल दुर्घटनेला पालिका प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार
खाद्यगृहे, पब्स, रेस्टॉरंट, बार यांना घातलेले नियम व अटी ते पाळत आहेत की नाही, याची खात्री करून घेण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले. परिणामी कमला मिलची दुर्घटना घडली, असे म्हणत उच्च न्यायालयाने दुर्घटनेचा ठपका पालिकेच्या गलथान कारभारावर ठेवला. ही घटना समाजासाठी धक्कादायक आहे, असेही सोमवारी न्यायालयाने म्हटले. २९ डिसेंबरला कमला मिल कंपाउंडमधील ‘मोजोस बिस्ट्रो’ व ‘वन अबव्ह’ला लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेला. त्यानंतर मुंबईतील खाद्यपदार्थ, रेस्टॉरंट, पब्स, बारचे फायर आॅडिट व्हावे, यासाठी माजी पोलीस आयुक्त जुलियो रिबरो यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. आर.एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे होती.

Web Title: Fire brigade officer, hookah company owner arrested in Kamla Mill firenandwa case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.