मनपा शाळा इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्णताबाबत माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 01:57 PM2018-06-21T13:57:30+5:302018-06-21T13:57:30+5:30

मुंबई अग्निशमन दलांना स्वत: मनपा शाळांचे इमारतीचे सी.एस. क्रमांक माहित नाही

Fire brigade officials denies to provide information about the safety and security of the building | मनपा शाळा इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्णताबाबत माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ !

मनपा शाळा इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्णताबाबत माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ !

googlenewsNext

मुंबई -  मुंबईत आगीच्या घटनेत वाढ होत असून मुंबई अग्निशमन दलातर्फे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मनपा शाळा सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण इमारतीची फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती मागितली असता सरळ आणि स्पष्ट माहिती देण्यास अग्निशमन दलाने टाळाटाळ केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे मनपा शाळा इमारतीची फायर ऑडिट, केलेल्या इमारतीची माहिती आणि  फायर ऑडिट न झालेल्या इमारतीची यादी तसेच मनपाच्या शाळा अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण नाही त्याअनुषंगाने अपेक्षित कार्यवाही याची माहिती दिनांक 26 डिसेंबर 2017 रोजी माहिती मागितली होती. विभागीय अग्निशमन अधिकारी एस.डी.सावंत यांनी जाणीवपूर्वक माहिती देण्याचे टाळत कळविले की मुंबई अग्निशमन दलाचे अभिलेख हा इमारतीच्या सी.एस. क्रमांक व विभागानुसार परिरक्षित केला जातो. तरी सदर इमरतीचा सी.एस. क्रमांक व विभागानुसार या कार्यालयास कळविण्यात यावा. जेणे करून माहिती पुरविणे शक्य होईल. पण किती शाळा सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण आहे फायर ऑडिट अहवाल प्राप्त झाले आणि किती शाळा सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण  नाही आहे,याची माहिती दिली नाही. सदर माहिती शकील अहमद शेख यांस प्रथम अपील दाखल केल्यानंतर ती माहिती 2 महिन्यानंतर प्राप्त झाली.

मुंबईतील 34 अग्निशमन केंद्राच्या हद्दीतील नामनिर्देशित अधिकारी यांना इमारतीचे तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले असून फायर ऑडिट सारखी महत्वाची माहिती अग्निशमन दल का देत नाही? तसेच  मुंबई अग्निशमन दलाला स्वतः त्यांची मनपा शाळा इमरतीचा सी.एस. क्रमांक माहित नाही? असा सवाल करत शकील अहमद शेख यांनी अग्निशमन दलाच्या या टाळाटाळीची तक्रार पालिका आयुक्त अजोय मेहता यांस केली आहे. मुंबईत जेव्हा आगीची घटना घडते तेव्हा अग्निशमन दलाने फायर ऑडिटकडे केलेले दुर्लक्ष सुद्धा तेवढेच कारणीभूत असल्याची बाब निर्दशनास आल्याचे नमूद करत फायर ऑडिट सारखी महत्वाची माहिती ऑनलाईन केल्यास जे फायर ऑडिट करत नाही, त्यांना नाईलाजाने लोकलज्जास्तव पुढाकार घेत करावी लागेल, असे शकील अहमद शेख यांनी सरतेशेवटी सांगितले.

Web Title: Fire brigade officials denies to provide information about the safety and security of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.