Join us

दक्षिण मुंबईतील मॉलमधील दोन दुकानांवर अग्निशमन दलाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 2:26 AM

अग्निशमन दलाने दक्षिण मुंबईतील मॉलमध्ये केलेल्या पाहणीत दोन दुकानांवर आज छापे मारण्यात आले.

मुंबई : अग्निशमन दलाने दक्षिण मुंबईतील मॉलमध्ये केलेल्या पाहणीत दोन दुकानांवर आज छापे मारण्यात आले. यामध्ये गॅस सिलिंडरचा बेकायदा वापर आढळून आला. गॅस सिलिंडरचा साठा महापालिकेने जप्त केला आहे. एकूण १५ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.मुंबईत आगीच्या घटना वाढत असल्याने अग्निशमन दलामार्फत उपहारगृह, मॉल, आस्थापना, इमारतींची नियमित तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत त्या ठिकाणी अग्निशमन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास तत्काळ कारवाई केली जात आहे. या मोहिमेंतर्गत अग्निशमन दलाने आज नरिमन पॉइंट येथील सीआर २ मॉलमध्ये अचानक भेट दिली.या मॉलमध्ये असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये नऊ तर फूड कोर्टमध्ये पाच गॅस सिलिंडर आढळून आले. मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडरचा साठा ठेवणे बेकायदेशीर असल्याने, अग्निशमन दलाने हा साठा जप्त केला असल्याची माहिती दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांदळे यांनी दिली.तत्काळ कारवाईमुंबईत आगीच्या घटना वाढत असल्याने अग्निशमन दलामार्फत उपहारगृह, मॉल, आस्थापना, इमारतींची नियमित तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत त्या ठिकाणी अग्निशमन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास तत्काळ कारवाई केली जाते़