Join us

अग्निशमन भरती : शारीरिक उंचीच्या निकषात न बसणारे उमेदवार अपात्र, प्रशासनाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 2:11 PM

प्रशासनाने म्हटले की, भरती प्रक्रिया निकषानुसारच होईल. महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलअंतर्गत अग्निशामक पदाच्या भरतीची मोहीम १३ जानेवारी २०२३ पासून सुरू झाली.

मुंबई : महिला अग्निशामक भरतीप्रसंगी वेळेत दाखल न झालेले आणि शारीरिक उंचीच्या निकषात न बसणारे उमेदवार अपात्र असणार आहेत. भरती प्रक्रियेच्या चित्रीकरणाची फेरतपासणी केल्यानंतर वेळ मर्यादा पाळल्याचे सिद्ध झाले तर पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांना परवानगी मिळेल, असे स्पष्टीकरण बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिले आहे. प्रशासनाने म्हटले की, भरती प्रक्रिया निकषानुसारच होईल. महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलअंतर्गत अग्निशामक पदाच्या भरतीची मोहीम १३ जानेवारी २०२३ पासून सुरू झाली. ४ फेब्रुवारी रोजी महिला उमेदवार भरती प्रक्रियेप्रसंगी निकष पूर्ण न केलेल्या ज्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले होते त्यापैकी काही उमेदवारांनी परिस्थितीचा विपर्यास करून प्रशासकीय प्रक्रियेत अडथळे आणले आणि जनमानसात गैरसमज पसरवला आहे. ही बाब लक्षात घेता, पालिका प्रशासनाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले.

भरती प्रक्रिया पारदर्शकवेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जात नाही. उंचीची प्रथम चाचणी केल्यानंतर एकूण ३ हजार ३१८ महिला उमेदवारांना प्रथम दर्शनी पात्र करून मैदानामध्ये दाखल करून घेतले. शारीरिक व मैदानी चाचणी संपल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येते. संपूर्ण भरती प्रक्रियेचे पारदर्शकपणे कामकाज करण्यात आले आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. 

टॅग्स :अग्निशमन दल