पालघर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन नव्याने पालघर जिल्हा व पालघर मुख्यालय व्हावे या मागणीवर अखेर तीस वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्का मोर्तब करण्यात आल्याच्या वृत्तानंतर समाजाच्या सर्व स्तरातून त्याचे स्वागत करण्यात आले. पालघरच्या हुतात्मा स्तंभासमोर पालघर जिल्हा मुख्यालय संघर्ष समिती, सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक यांनी एकत्र जमून फटाके वाजवून मिठाई भरवून आपला आनंद व्यक्त केला.४जव्हारच्या वावर वांगणीच्या कुपोषणाने प्रथम जिल्हा विभाजनाची गरज पुढे आली. सन १९९३ साली सुुरु झालेला जिल्हा विभाजनाचा प्रवास अखेरीस २०१४ साली संपला. अशोक चव्हाण तर युतीच्या काळातील मनोहर जोशी, नारायण राणे इत्यादी मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत पुढे सरकत राहीलेला व प्रलंबित राहिलेला महत्वपूर्ण प्रश्न अखेर आज मार्गी लागला. तो मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कारकिर्दीत. राज्यमंत्री राजेंद्र गावितांना आमदार म्हणून मिळालेली संधी व राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न सातत्याने पुढे रेटला. त्यातच इथल्या ग्रामीण भागातील जनतेचा रेटा व दबाव सरकारवर सातत्याने वाढत गेला. ४आता झालेले ठाणे जिल्ह्याचे विभाजन ही या सर्वांची निष्पती असे निश्चितपणे म्हणता येईल. १५ तालुके, ८ महानगर पालिका, १ कोटी १० लाखाची प्रचंड लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्र असलेल्या या ठाणे जिल्ह्याचे विभाजन ही प्रशासकीय व विशेषत: ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची गरज होती. ४२१ वर्षानंतर ही गरज पूर्ण होत असून त्यामुळे पालघरसह आठ तालुक्याची प्रशासकीय सोय तर होणारच आहे परंतू ग्रामीण आदिवासीबहुल या भागाच्या विकासालाही या निर्णयाने वाट मिळणार आहे.
परिसरात फोडले फटाके... वाटली मिठाई
By admin | Published: June 14, 2014 2:54 AM