मुंबई : चेंबूर येथील बीपीसीएलमध्ये आग लागल्याचे वृत्त असून परिसरात धुराचे लोट परसले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीपीसीएलमध्ये मोठ्या स्फोटाचा आवाज आला. त्यांनतर स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीच माहिती कळू शकली नाही. दुसरीकडे, प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे स्पोटाच्या आवाजाने माहुलगाव हादरुन गेले आहे.
दरम्यान, या आगीत 42 कर्मचारी जखमी झालेत तर एक जण गंभीर आहे. तर 21 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत कंपनीतील 200 ते 400 कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सर्वच कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. तसेच आगीवर 70 टक्के नियंत्रण आणण्यात आले आहे.
पाहा व्हिडिओ -