मुंबईत कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवर (LTT Station fire) बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली होती. स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील कँटीनमध्ये आग लागली. स्टेशनच्या प्रतिक्षालयापर्यंत आग पसरण्यास सुरुवात होणार त्याआधीच अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. आग इतकी भीषण होती की स्थानकाबाहेरून धुराचे लोट पाहायला मिळत होते. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस हे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीचं मुंबईतील अतिशय महत्वाचं टर्मिनस आहे. स्थानकावर दैनंदिन पातळीवर मोठी गर्दी असते. आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.