भंडाऱ्यातील घटनेनंतर 'या' व्यक्तीची आली आठवण; जीवाची बाजी लावत चिमुकल्यांचे वाचवले होते प्राण

By मुकेश चव्हाण | Published: January 9, 2021 03:22 PM2021-01-09T15:22:27+5:302021-01-09T15:22:33+5:30

31 ऑगस्ट 2019 च्या मध्यरात्री इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर  या रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती.

The fire broke out at Indira Gandhi Medical College, Nagpur at midnight on August 31, 2019 due to a short circuit. | भंडाऱ्यातील घटनेनंतर 'या' व्यक्तीची आली आठवण; जीवाची बाजी लावत चिमुकल्यांचे वाचवले होते प्राण

भंडाऱ्यातील घटनेनंतर 'या' व्यक्तीची आली आठवण; जीवाची बाजी लावत चिमुकल्यांचे वाचवले होते प्राण

Next

मुंबई/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला.  मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. मात्र याचदरम्यान अधिपरिचारिका म्हणून इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे कार्यरत सविता इखर  (49) यांची आठवण अनेकजणांना आली.

31 ऑगस्ट 2019 च्या मध्यरात्री इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर  या रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्यावेळी सविता इखर या अधिपरिचारिका नवजात शिशु अतिदक्षता विभागात कर्तव्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखून धाडस दाखवत जीवाची पर्वा न करता नऊ नवजात शिशुना बाहेर काढण्यात यश मिळवलं होतं. हे सर्व शिशु 1 ते 15 दिवसाच्या आतील होते, अशी माहिती समोर आली आहे. 

तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. 

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

blockquote class="twitter-tweet">

Ex-gratia of Rs 5 lakhs each to be provided to the kin of the deceased in the fire incident at Bhandara District General Hospital: Rajesh Tope, Health Minister, Maharashtra pic.twitter.com/Qnsct8zeEj

— ANI (@ANI) January 9, 2021

दरम्यान, मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ठेवलं जातं. लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलण्यात आलं. 

Read in English

Web Title: The fire broke out at Indira Gandhi Medical College, Nagpur at midnight on August 31, 2019 due to a short circuit.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.