Join us

मुंबई : फोर्ट परिसरात इमारतीत अग्नितांडव, अग्निशमन दलातील 2 जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 08:37 IST

मुंबईतील फोर्ट परिसरातील पटेल चेम्बर्स इमारतीला पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलानं अथक मेहनत घेतल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.

मुंबई : मुंबईतील फोर्ट परिसरातील पटेल चेम्बर्स इमारतीला पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलानं अथक मेहनत घेतल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 18 गाड्या दाखल झाल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार,इमारतीला लागलेली आग अत्यंत भीषण स्वरुपाची होती.  यावेळी इमारतीचा काही भागदेखील कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अग्निशमन दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले. दरम्यान, अद्याप या आगीचे कारण अस्पष्ट आहे.   

 

 

 

 

टॅग्स :मुंबईआग