धनसार येथील केमिकल कंपनीला आग

By admin | Published: July 11, 2015 11:06 PM2015-07-11T23:06:34+5:302015-07-11T23:06:34+5:30

सातपाटी-पालघर रस्त्यावरील धनसार या गावामध्ये असलेल्या नेल एक्स्ट्रू लॅमीपॅक प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला आज पहाटे मोठी आग लागली.

Fire at a chemical company in Dhanarsar | धनसार येथील केमिकल कंपनीला आग

धनसार येथील केमिकल कंपनीला आग

Next

पालघर : सातपाटी-पालघर रस्त्यावरील धनसार या गावामध्ये असलेल्या नेल एक्स्ट्रू लॅमीपॅक प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला आज पहाटे मोठी आग लागली. सुटीमुळे कंपनीचे उत्पादन बंद असल्याने जीवितहानी टळली असली तरी एक कामगार जखमी झाला आहे. या वेळी कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या केमिकल कंपनीमध्ये शाई तयार होते. आज पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली. यामध्ये रासायनिक उत्पादनाच्या स्फोटाच्या आवाजामुळे धनसार गावातील अनेक नागरिकांनी आग विझवण्यासाठी कंपनीकडे धाव घेतली. मात्र, कंपनीच्या सुरक्षारक्षकाने त्यांना रोखले. या आगीची माहिती अग्निशमन दलाला उशिराने कळल्यानंतर पालघर नगरपरिषद व तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या या आगीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत होत्या.
शुक्रवारी कंपनीला सुटी असल्याने उत्पादन बंद होते. त्यामुळे जीवितहानी घडली नसली तरी कंपनीत काम करणारा एक कामगार आग विझवण्याच्या प्रयत्नात भाजून जखमी झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. घटनास्थळी पालघर पोलीस स्टेशनचे अधिकारी व औद्योगिक सुरक्षा संचालनालय, वसई यांचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी कंपनीकडून सुरक्षा उपकरणे व उपाययोजनांच्या उदासीनतेबाबत औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सहायक संचालक सुनील ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता आग आटोक्यात आली असली तरी माझी टीम परिस्थितीची पाहणी करीत आहे व एक कामगार जखमी असून त्याला पालघरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Fire at a chemical company in Dhanarsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.