Join us

चिंचपोकळीत आग; मूर्तीकाराच्या कार्यालयास झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 21:14 IST

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.

ठळक मुद्दे पाच अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेण्यात आले.लागलेल्या आगीची झळ लगतच्या मूर्तीकारच्या कार्यालयालादेखील बसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

मुंबई : चिंचपोकळी येथील अनंत मालवणकर मार्गावरील बावला कपाऊंड येथील झाडाला शनिवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. झाडाला लागलेल्या आगीच्या धूराचा लगतच्या अनंत निवासमधील रहिवाशांना मोठा त्रास झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.

पाच अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेण्यात आले. रात्री साडे आठवाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले होते. दरम्यान, येथे लागलेल्या आगीची झळ लगतच्या मूर्तीकारच्या कार्यालयालादेखील बसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :आगपुणे अग्निशामक दलमुंबई