फटाक्यांमुळे दोन ठिकाणी आग
By admin | Published: November 12, 2015 12:25 AM2015-11-12T00:25:42+5:302015-11-12T00:25:42+5:30
दिवाळीतील फटाक्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमधील बदामच्या गाळ्याला मंगळवारी रात्री आग लागली
नवी मुंबई : दिवाळीतील फटाक्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमधील बदामच्या गाळ्याला मंगळवारी रात्री आग लागली. गाळ्यांवरील शेड जळून खाक झाले. बुधवारी सकाळी तुर्भे डंपींग ग्राऊंडवरील वृक्षाच्या फांद्या व पाल्याला आग लागली सायंकाळपर्यंत ही आग विझविण्याचे काम सुरू होते.
मसाला मार्केटमधील जी ३६ गाळ्याच्या छताला फटाक्यामुळे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. मार्केटध्ये रॉकेट उडविण्यात येत होती. त्यामधील एक छतावर पडल्याने तेथील बदामाचा भुसा व लागडांनी तत्काळ पेट घेतला. आगीमध्ये टेरेसवर टाकलेलेशेड पुर्णपणे जळून खाक झाले आहे. बदाम फोडण्याची तीन मशीन जळून गेली आहेत. छतावर ठेवलेल्या भुशाच्या गोणी जळून खाक झाल्या आहेत. व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे छतावर लागडीशेड टाकल्यामुळे पाच गाळ्यांवरील शेड जळून गेले. नवी मुंबई, ठाणे मधील अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.