Join us

कामाचे तास निश्चित करण्यासाठी पुकारलेले अग्निशमन अधिकाऱ्यांचे आंदोलन अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 2:36 AM

कामाचे तास निश्चित करण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी पुकारलेले आंदोलन अखेर सोमवारी मागे घेण्यात आले. पालिका प्रशासन आणि फायर ब्रिगेड आॅफिसर्स असोसिएशन यांच्यातील बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई : कामाचे तास निश्चित करण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी पुकारलेले आंदोलन अखेर सोमवारी मागे घेण्यात आले. पालिका प्रशासन आणि फायर ब्रिगेड आॅफिसर्स असोसिएशन यांच्यातील बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या वेळी अग्निशमन अधिका-यांना प्रशिक्षणापूर्वी कोणत्याही कामाची सक्ती केली जाणार नाही. तसेच पालिका कायद्यानुसारच कामे सोपवली जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले.महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवरक्षक अधिनियम २००६चे उल्लंघन करून अग्निशमन अधिकाºयांना प्रशिक्षण न देता कामाची सक्ती केली जाते. शिवाय अनेक मागण्याही प्रलंबित आहेत. आॅफिसर्स असोसिएशनने पालिके विरोधात असहकार आंदोलन सुरू केले होते. याबाबत अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांच्यासोबत आज बैठक झाली. यावेळी संघटनेच्या अनेक मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.असोसिएशनच्या मागण्या- पूर्णवेळ लिपिक नेमणार- प्रतिबंधात्मक व अनुपालन, ना हरकत प्रमाणापत्राचे काम वेगळे असेल.- फायर फायटिंग व स्टेशन व्यवस्थापनाचे काम वरीष्ठ केंद्र अधिकाºयांकडे- अग्निशमन अधिकारी पालिका कायदा १८८८ अन्वये निरीक्षण करणार आहेत.

टॅग्स :मुंबई