अग्निशमन अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:43 AM2018-03-17T06:43:35+5:302018-03-17T06:43:35+5:30
मुंबई अग्निशमन दलातील अधिका-यांनी अग्निप्रतिबंधक व अनुपालनाचे प्रतिबंधक काम करण्यास नकार देत बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले.
मुंबई : मुंबई अग्निशमन दलातील अधिका-यांनी अग्निप्रतिबंधक व अनुपालनाचे प्रतिबंधक काम करण्यास नकार देत बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले. फायर ब्रिगेड आॅफिसर्स असोसिएशनने मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास म्हणाले की, कमला मिल येथे लागलेल्या आगीनंतर अग्निशमन दलातील दोन अधिकाºयांना अटक झाली आहे. त्यामुळे अग्निशमन अधिकारी भीतीच्या छायेखाली काम करू शकत नाहीत. या आंदोलनात आग विझवण्याचे काम अधिकारी करतील. मात्र इतर कामे करणार नाहीत. कारण अग्निशमन अधिकाºयांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची पडताळणी करावी, याबाबतची स्पष्ट तत्त्वेच नाहीत. मुळात एका वॉर्डसाठी एकच अधिकारी असल्याने संपूर्ण वॉर्डमधील आस्थापने, इमारतींची पडताळणी त्याने करणे अशक्यप्राय आहे. म्हणून या अतिरिक्त कामांसाठी वेगळ्या अधिकारी नेमण्याची मागणी संघटनेने केली आहे.
सोमवारी धरणे
आगीच्या दुर्घटनेच्या चौकशीत दोन अग्निशमन अधिकाºयांना अटक झाली. त्याच्या निषेधार्थ तसेच अन्य मागण्यांसाठी अग्निशमन दलातील जवान सोमवारी धरणे आंदोलन करणार आहेत.