मुंबईतील बांबू गल्लीला भीषण आग, परिसरात धुराचे प्रचंड लोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 07:24 PM2019-12-27T19:24:21+5:302019-12-27T19:33:25+5:30
अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई : साकीनाका परिसरातील बांबू गल्लीला भीषण आग लागली आहे. या परिसरात बांबू व्यावसायिकांची मोठी गोदामे असून यामधील काही गोदामांना आग लागली आहे. ही आग संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास लागली.
परिसरात आगीमुळे धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले असून या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 17 गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आहेत. तसेच खैरानी रोड परिसरात वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.
Maharashtra: Fire fighting operations underway at the factory in Ghatkopar, Mumbai; 15 fire tenders at the spot. https://t.co/GFdKLXA2M5pic.twitter.com/8eg3m3eGYV
— ANI (@ANI) December 27, 2019
दरम्यान, कमला मिल कंपाऊंडसारख्या आगीच्या घटनेने मुंबईसाठी धोक्याची घंटा वाजवली. उपाहारगृह व आस्थापनांची झाडाझडती सुरु झाली. आगीशी खेळणाऱ्यांना कारवाईचा बडगा दाखविण्यात आला. परंतु, अद्यापही अनेक ठिकाणी अग्नि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जातात. यामुळे गेल्या सहा महिन्यांत ९८५ ठिकाणी आग लागल्याचे दिसून आले. अशा दुर्घटनांमध्ये पाच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून १२३ लोकं जखमी झाले आहेत.
ऑक्टोबर २०१८ ते मार्च २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत मुंबईत लागलेल्या आगीची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. मुंबई अग्निशमन दलाकडे या कालावधीत २९१७ दुर्घटनांची नोंद झाली आहे. यापैकी ९८५ ठिकाणी आग, घर पडण्याच्या ७० घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये एकूण २४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये १ ते १५ तारखेपर्यंत सर्वाधिक १२५ ठिकाणी आग लागण्याची घटना घडल्या.