अंधेरी एमआयडीसीतील इमारतीला भीषण आग, एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 03:40 PM2020-02-13T15:40:26+5:302020-02-13T15:54:16+5:30
अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई - अंधेरी एमआयडीसी परिसरातील रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील मरोळ एमआयडीसीतील एका व्यावसायिक इमारतीला गुरुवारी (13 फेब्रुवारी) ही आग लागली. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाने ही चौथ्या स्तरावरची आग असल्याची माहिती दिली आहे. तसेच इमारतीत असलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात यश आले असून इमारतीत कोणीही अडकलेलं नाही अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. परिसरातील सर्व इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
अंधेरी MIDCतील इमारतीला भीषण आग, अग्निशामक दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी https://t.co/xmoutFXlla
— Lokmat (@MiLOKMAT) February 13, 2020
Mumbai: Fire continues to rage at Rolta company in Andheri East. 8 fire tenders are present at the spot. As a precautionary measure, the nearby buildings have been vacated. https://t.co/llJrsypyBJpic.twitter.com/2g6lCHfRWt
— ANI (@ANI) February 13, 2020
महत्त्वाच्या बातम्या
सावरकरांबद्दल काँग्रेसनं जे लिहिलंय ते शिवसेनेला मान्य आहे का?; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा
सरकारी शाळांमधून सावरकरांचे फोटो हटवा, राज्य सरकारचा आदेश
भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांची नियुक्ती, मुंबईचे अध्यक्षही ठरले!
नेत्यांवरील गुन्हे जनतेला कळू देत, ते वेबसाईटवर प्रकाशित करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश
China Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेनं 'कोरोना'ला दिलं नवं नाव