मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू, पब मालकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 08:24 AM2017-12-29T08:24:00+5:302017-12-29T10:53:07+5:30
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगप्रकरणी पब मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगप्रकरणी पब मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अग्नितांडवात 14 जणांचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हे अग्नितांडव एवढं भीषण होतं की, मोजोसच्या खाली असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या आगीत होरपळून व गुदमरुन 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जण जखमी आहेत, अशी माहिती केईएम प्रशासनानं दिली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी 4 तासांचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं असून, सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मोजो पबमध्ये ही आग लागली.
पाहता पाहता आग वा-यासारखी पसरली. आजूबाजूचा परिसरही आगीच्या विळख्यात सापडला. आगीच्या घटनेमुळे कमला मिल कम्पाऊंडमधला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. हॉटेल मोजोसला लागलेल्या भीषण आगीमुळे रेस्टॉरंट आणि पबचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
हॉटेल लंडन टॅक्सीपर्यंत या आगीचे लोळ पोहोचले व हॉटेल लंडन टॅक्सीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. कमला मिलमधल्या हॉटेल लंडन टॅक्सीच्या टेरेसवर पब आहे. या आगीमुळे हॉटेल लंडन टॅक्सीचंही नुकसान झालं आहे. मोजो हे रेस्टॉरंट पूर्णतः शाकाहारी असून, या रेस्टॉरंटमध्ये गुजराती, मारवाडी आणि सिंधी लोकांची गर्दी असते. मोजोच्या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबूचे बांधकाम होते.
त्या बांबूंना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कमला मिल कंपाऊंडमध्ये tv9 मराठी, टाइम्स नाऊ, मुंबई मिरर सारखी मीडिया हाऊस आहेत. अचानक लागलेल्या या आगीमुळे विविध कार्यालयातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान, आगीनंतर टीव्ही 9 मराठी, ईटी नाऊ, मिरर नाऊ, झूम या वाहिन्यांच्या प्रसारणावर परिणाम झाला.
मृतांची नावं
प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली जोशी, पारुल, खुशबू, मनीषा शहा, प्राची शहा, प्राची खेतान, यश ठक्कर, सरबजित परेडा, धैर्य ललानी, विश्व ललानी
#KamalaMills Fire: Transmission of the TV channels ET Now, Mirror Now, Zoom & TV9 Marathi affected due to the fire. pic.twitter.com/rF07LhfcsR
— ANI (@ANI) December 29, 2017
14 dead & 14 injured, out of which 2 are critical: BMC on #KamalaMills fire (Earlier visual) pic.twitter.com/KkirCphpNQ
— ANI (@ANI) December 29, 2017
#KamalaMills Fire: 'Postmortem reveals that all the 14 deaths were due to to suffocation,' Dr.Rajesh Dere, doctor who performed the postmortems (Earlier Visual) pic.twitter.com/oOqU6CCKz9
— ANI (@ANI) December 29, 2017
#WATCH: Last night visuals of fire at #KamalaMills compound in #Mumbai's Lower Parel, the incident has claimed 14 lives. pic.twitter.com/Ud2s6QXTFF
— ANI (@ANI) December 29, 2017
Last night visuals of fire at #KamalaMills compound in #Mumbai's Lower Parel, the incident has claimed 14 lives. pic.twitter.com/wD2vm0o1u6
— ANI (@ANI) December 29, 2017
#KamalaMills Fire Update: 'All the 12 injured are out of danger now,' Dean of KEM Hospital Avinash Supe; Early morning visuals from KEM hospital #Mumbaipic.twitter.com/qLu3c1Jp0z
— ANI (@ANI) December 29, 2017
#KamalaMills Fire: Transmission of the TV channels ET Now, Mirror Now, Zoom & TV9 Marathi affected due to the fire.
— ANI (@ANI) December 29, 2017
#KamalaMills Fire Update: FIR under charges of culpable homicide registered against the restaurant '1 Above' where the fire broke out.
— ANI (@ANI) December 29, 2017
Fire breaks out in Kamala Mills compound in Lower Parel area of Mumbai. Six fire tenders at the spot. pic.twitter.com/vnYITHK9jc
— ANI (@ANI) December 28, 2017