Join us

महालक्ष्मी येथील 'धरम व्हिला' इमारतीला आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 9:05 PM

सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून इमारत पूर्णपणे रिकामी केली आहे. 

ठळक मुद्देमहालक्ष्मी मंदिर परिसरातील धरम व्हिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रात्री उशिरा अचानक आग लागली. फायर इंजिनच्या मदतीने पहाटे 5 वाजता आग आटोक्‍यात आणली. परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली असल्याने अग्निशमन वाहनांना इमारतीजवळ येण्यास अडचणी येत होत्या.

मुंबई - महालक्ष्मी येथील 'धरम व्हिला' या इमारतीला मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. ही आग चौथ्या मजल्यावरून नवव्या मजल्यापर्यंत झपाट्याने पसरल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. अग्निशमन दलाने इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुखरूप सुटका केली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून इमारत पूर्णपणे रिकामी केली आहे. महालक्ष्मी मंदिर परिसरातील धरम व्हिला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रात्री उशिरा अचानक आग लागली. आगीमुळे इमारतींमध्ये प्रवेश करण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येत होत्या. फायर इंजिनच्या मदतीने पहाटे 5 वाजता आग आटोक्‍यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. फायर इंजिन आणि पाण्याचे बंब घटनास्थळी पोहचले; परंतु परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली असल्याने अग्निशमन वाहनांना इमारतीजवळ येण्यास अडचणी येत होत्या. अखेरीस टोईंग व्हॅन आणून ही वाहने हटवली आणि रस्ता मोकळा केला.  

टॅग्स :आगपुणे अग्निशामक दल