Join us

मुंबईत आगीचे सत्र संपेना! नागपाडा, सायनमधील इमारतींना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 5:29 AM

लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या आगीची झळ कमी होत नाही तोच नववर्षात पुन्हा एकदा मुंबईत इमारतींना आग लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. गुरुवारी अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील मेमून मंझिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.

मुंबई - लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या आगीची झळ कमी होत नाही तोच नववर्षात पुन्हा एकदा मुंबईत इमारतींना आग लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. गुरुवारी अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील मेमून मंझिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ताजी असतानाच शुक्रवारी नागपाडा आणि सायन-प्रतीक्षानगर येथे आग लागल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने दोन्ही दुर्घटनांमध्ये जीवितहानी झालेली नाही.दक्षिण मुंबईतील नागपाडा येथील सहा मजली जिया इमारतीच्या तळघरातील ३ गोदामांना दुपारच्या सुमारास आग लागली. मात्र, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीत अडकलेल्या चौघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.दक्षिण मुंबईतील नागपाडा येथे जिया ही सहा मजली इमारत आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास इमारतीच्या तळघरातील गोदामाला आग लागली. आगीची माहिती मिळताच, तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे काम हाती घेतले. दुर्घटनाग्रस्त इमारतीलगत असलेली शाळा सुरक्षेच्या दृष्टीने रिकामी करण्यात आली. आगीमध्ये गोदामातील मोबाइल, कपडे आणि रसायनसदृश साहित्य जळून खाक झाले. सुमारे ५ हजार चौरसफूट क्षेत्रफळावर पसरलेल्या गोदामाची आग विझविताना, अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळ्यांना सामोरे जावे लागले. आगीदरम्यान इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या ४ नागरिकांनाही बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असली, तरी जीवितहानी झालेली नाही. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली.नागपाड्याची आग विझेपर्यंत सायंकाळी ६ वाजता सायन-कोळीवाडा प्रतीक्षानगर येथील तळमजला अधिक चार या एल/आठ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. घटनास्थळी तत्काळ दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, गुरुवारनंतर लगेचच शुक्रवारी इमारतीला लागलेल्या आगीमुळे मुंबईतील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.चौघांना सुखरूप बाहेर काढलेजिया इमारतीतील सुमारे ५ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या गोदामाची आग विझविताना, अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळ्यांना सामोरे जावे लागले. आगी दरम्यान इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या ४ नागरिकांनाही बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

टॅग्स :आगमुंबई