बीपीसीएल कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:32 PM2020-01-14T13:32:06+5:302020-01-14T13:35:31+5:30
घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे.
ठळक मुद्देही आग आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास लागलीएअर कॉम्प्रेसरला ही आग लागली होती.बीपीसीएलच्या कर्मचार्यांनी ती विझवली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
मुंबई - ट्रॉम्बजवळील माहुल येथील शंकर मंदिराजवळ असलेल्या बीपीसीएल कंपनी मुख्य प्रवेशद्वारापाशी आग लागली. ही आह आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास लागली असून एअर कॉम्प्रेसरला ही आग लागली होती. मात्र, बीपीसीएलच्या कर्मचार्यांनी ती विझवली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. आग आटोक्यात आणण्याजोगी असल्याने कर्मचाऱ्यांनीच ती विझवली. या घटनेत अद्याप कोणीही जखमी असल्याची माहिती मिळालेली नाही.
मुंबई - ट्रॉम्बेजवळील माहुल येथील बीपीसीएल कंपनीच्या प्लांटला लागली आग, अग्निशमन दलाचे पथक दाखल https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 14, 2020
आगीनंतर धुराचे काळे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरले आहेत. २०१८ साली देखील बीपीसीएल कंपनीत भीषण आग लागली होती.