Join us

विलेपार्ल्यात रहिवाशी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग; एका वृद्ध महिलेचा मृत्यू

By मनोहर कुंभेजकर | Updated: November 10, 2023 21:58 IST

रात्री आठ वाजता वाजता आग विझवल्याची माहिती फायर ब्रिगेडच्या एका अधिकाऱ्याने दिली.

मुंबई-आज दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आज सायंकाळी विलेपार्ले पूर्व, नरिमन रोड,पूनम बाग येथील ग्रँड रेसिडेन्सी या 12 मजली इमारतीतीच्या 2ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 201ला भीषण आग लागली. या आगीत हर्षदा जनार्दन पाठक (95) वर्षे यांचा मृत्यू झाला असल्याचे कूपर हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळके घोषित केले.

या इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 201 मध्ये इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, टीव्ही, रेफ्रिजरेटर, लाकडी फर्निचर, लाकडी दरवाजे, फॉल्स सिलिंग, घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींपर्यंत आग पसरली. विद्युत पुरवठा खंडित केल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी 03 मोटर पंपांच्या एका छोट्या होस लाईनने  रात्री आठ वाजता वाजता आग विझवल्याची माहिती फायर ब्रिगेडच्या एका अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :आग