मुंबईतल्या पवई येथे इमारतीला लागलेल्या भीषण आगीवर अखेर नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 11:17 AM2020-07-01T11:17:53+5:302020-07-01T11:20:49+5:30
चार फायर इंजिन आणि इतर साहित्याने आग आटोक्यात आणण्यात आली असून, येथील बहुतांशी साहित्य जळून खाक झाले. दरम्यान ही इमारत व्यावसायिक इमारत आहे.
मुंबई : मुंबईत आगीच्या घटना घडत असून, बुधवारी सकाळी सहा वाजता पवई येथे एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली. डेल्फी असे या इमारतीचे नाव असून, पाचव्या माळ्यावर लागलेली आग सकाळी पावणे नऊ वाजता नियंत्रणात आली. चार फायर इंजिन आणि इतर साहित्याने आग आटोक्यात आणण्यात आली असून, येथील बहुतांशी साहित्य जळून खाक झाले. दरम्यान ही इमारत व्यावसायिक इमारत आहे.
दारुखाना येथील सिग्नल हिल अॅव्हन्यू रोडवरील बॉम्बे टिंबर मार्टमध्ये शनिवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ४ फायर इंजिन, ४ जम्बो टँकर्सच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
A fire broke out at Delphi Building in Powai at about 6:15 am. Fire confined to the 3,000 sq ft office area on 5th floor. 3 small engine lines of 5 fire motor pumps are in operation. No injuries reported: Mumbai Fire Brigade pic.twitter.com/E2ivOEsVRr
— ANI (@ANI) July 1, 2020
मुंबई शहर आणि उपनगरातील आगीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात तब्बल ३ ठिकाणी आग लागल्याल्या घटना घडल्या. या तिन्ही आगीमध्ये मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली असून, सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही. बुधवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास अंधेरी पूर्वेकडील नंदधाम इंडस्ट्रीयल इस्टेट, नरिमन पॉइंट येथील जॉली मेकर चेंबर २ येथे गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आणि लोअर परळ येथील रघुवंशी मॉल कम्पाऊंड येथील पी २ इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती.