Join us

मुंबईत आगीचे सत्र सुरूच; घाटकोपर रेल्वे स्थानकाशेजारील कचऱ्याच्या ढिगाला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 4:00 PM

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले असून त्यांच्यासोबत आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व स्थानिकांचे प्रयत्न सुरु होते. 

ठळक मुद्देकचऱ्याचा ढिगाला आज दुपारी आग लागलीरुळाशेजारील गटाराचे पाणी बादलीने आणून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होतेआता आग विझली असून अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई - घाटकोपररेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या रुळाशेजारी असलेल्या कचऱ्याचा ढिगाला आज दुपारी आग लागली. मुंबईत अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्यानंतरही आगीचे सत्र सुरूच आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सुटतात. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले असून त्यांच्यासोबत आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व स्थानिकांचे प्रयत्न सुरु होते. रुळाशेजारील गटाराचे पाणी बादलीने आणून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, आता आग विझली असून अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आग किरकोळ होती. मात्र शेजारीच प्लॅटफॉर्म असल्याने ये - जा करणाऱ्या लोकलला त्याचा धोका होऊ शकत होता. 

टॅग्स :घाटकोपरअंधेरी कामगार रुग्णालयाला आगरेल्वेआग