Join us

पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील दुकानाला आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 18:28 IST

आग किरकोळ असून कोणासही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठळक मुद्देआज ५. ३० वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली अग्निशाम दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई - अंधेरी पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गानजीक अमॅझॉन शॉप सेन्टरमधील दुकान क्रमांक १४ ला आग लागली होती. आज ५. ३० वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली असून आगीची माहिती मिळताच अग्निशाम दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग विझविण्याचे शर्थीचे कार्य करत आहेत. आग किरकोळ असून कोणासही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

टॅग्स :आगपुणे अग्निशामक दलअंधेरी