अंबरनाथ / पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मोदी केम फार्मा या रासायनिक कारखान्याला शुक्रवारी रात्री ११.३० वाजता भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून, अग्निशमन दलातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे.
या कारखान्यात विविध रासायनिक केमिकल्सवर या कारखान्यात प्रक्रिया होते. मात्र, शुक्रवारी अचानक कारखान्यातील एका बाजूला आग लागली असल्याचे काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ सर्व कर्मचारी कारखान्याबाहेर पडले. आगीची तीव्रता अतिशय भीषण होती. अग्निशमन दलालाही तत्काळ पाचारण करण्यात आले. मात्र, या कंपनीतून गॅसची गळती झाल्याने अंबरनाथ अग्निशमन दलातील बाळासाहेब देशमुख (३२) यांचा गुदमरून मृत्यू झाला. श्वसनात अमोनिया वायू गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना लागलीच रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी पहाटे चार वाजता मृत्यू झाला. .
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तळोजा औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाचे प्रमुख दीपक दोरुगडे यांचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या आगीत कारखाना जळून पूर्णपणे खाक झाला. मध्यरात्री कारखान्याला लागलेली आग सकाळी शनिवारी सकाळी अकरा वाजता आटोक्यात आली.
चौकट -
बाळासाहेब देशमुख यांच्या मृत्यूमुळे अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन केंद्रातील कर्मचारीही मानसिक तणावाखाली आले आहेत. एक ३२ वर्षांचा जवान आपल्यातून निघून गेल्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. शनिवारी दुपारी एमआयडीसी अग्निशमन केंद्रात त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. देशमुख यांना चार वर्षांचा मुलगा असून त्यांची पत्नी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे.
फोटो आहे - तळोजा एमआयडीसी या नावाने पाठवत आहे