Join us

मुंबईतल्या सिंधिया हाऊस बिल्डिंगच्या तिस-या मजल्याला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 18:20 IST

बलार्ड पिअर इथल्या सिंधिया हाऊस बिल्डिंगच्या तिस-या आणि चौथ्या मजल्याला भीषण लागली.

मुंबई- फोर्ट येथील बलार्ड इस्टेटमधील सिंधिया हाऊस या सहा मजली इमारतीच्या तिस-या आणि चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ फायर इंजिन आणि सहा जेटीच्या मदतीने आग विझवण्याचे काम वेगाने हाती घेतले.दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये चार ते पाच जण वरच्या मजल्यासह गच्चीवर अडकल्याची माहिती प्राप्त होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले. शिवाय दुस-या मजल्यावर अडकलेल्या आणखी एका व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.आगीमध्ये धुराचा त्रास झालेल्या चार ते पाच जणांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, आग विझवण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

टॅग्स :मुंबईआग