लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माझगाव येथील थॉवर मेन्शन नंबर ४ मधील पहिल्या मजल्यावरील रजनी केळुसकर यांच्या बंद घराला शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास अचानक आग लागली. प्रसंगावधान राखत चाळीमधील रहिवासी वसंत कांबळी यांनी इमारतीमधील अमित मालवणकर आणि ललित मालवणकर यांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडून जीवाची पर्वा न करता आत घुसून आग विझविण्याचा प्रयत्न केला. विलास मालवणकर आणि रवी मालवणकर यांनी वीजपुरवठा खंडित केला.
अग्निशमन दल, डोंगरी पोलीस ठाणे, मुंबई महापालिका ई विभाग आणि म्हाडाला तत्काळ कळविण्यात आले. अग्निशमन दल, डोंगरी पोलीस तत्काळ आपली सेवा पुरविण्यात यशस्वी ठरले. इमारतीमधील वसंत कांबळी, अमित मालवणकर, ललित मालवणकर, विलास मालवणकर, रवी मालवणकर, विजय घरत यांच्या तत्परतेने हानी टळली. अन्यथा इमारत जीर्ण असल्याने हानी होऊ शकली असती, असे मत रहिवाशांनी व्यक्त केले.