Mumbai's Parel Fire : परळमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत चौघांचा मृत्यू, 21 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 08:58 AM2018-08-22T08:58:22+5:302018-08-22T23:02:24+5:30

Mumbai's Parel Fire : क्रिस्टल टॉवरच्या आगीची माहिती प्राप्त होताच सकाळी पावणे नऊ वाजता अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बाराव्या मजल्यावर आग रौद्र स्वरुप धारण करत असतानाच इमारतीच्या मजल्यांवर आगीचा

Fire on top of the crystal tower in Parel | Mumbai's Parel Fire : परळमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत चौघांचा मृत्यू, 21 जण जखमी

Mumbai's Parel Fire : परळमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत चौघांचा मृत्यू, 21 जण जखमी

Next

मुंबई - परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील तळमजला अधिक सतरा या क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुषांचा तर एका महिलेचा समावेश आहे. मृतांमध्ये एका महिला ज्येष्ठ नागरिक असून, बबलू शेख (३६), शुभदा शिर्के (६२), अशोक संपत आणि सजीव नायर अशी मृतांची नावे आहेत. दुर्घटनेमधील आणखी दोघांवर केईएम रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये उपचार सुरु असून, या दुर्घटनेत आणखी एकवीस जण जखमी झाले आहेत.

क्रिस्टल टॉवरच्या आगीची माहिती प्राप्त होताच सकाळी पावणे नऊ वाजता अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बाराव्या मजल्यावर आग रौद्र स्वरुप धारण करत असतानाच इमारतीच्या मजल्यांवर आगीचा धूर पसरत होता. आगीतून बाहेर पडण्यासाठी इमारतीच्या जिन्यांचा रहिवाशांकडून वापर होत असतानाच समयसुचकता दाखवत अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वप्रथम येथे अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी कार्य सुरु केले. याच काळात बाराव्या मजल्यावर लागलेली आग पसरू नये म्हणून तातडीने आग शमविण्याचे काम हाती घेण्यात आले. फायर फायटिंगचे काम सुरु असतानाच जिन्यांवर अडकलेल्या रहिवाशांना वाचविण्याचे काम सुरु होते. मात्र वारा वेगाने वाहत असल्याने आगीच्या ज्वाळा पसरतच होत्या. इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील इल्कट्रीक साहित्याला लागलेली आग दरम्यानच्या काळात पसरत होती. विशेषत: लिफ्ट लॉबीसह कॉरीडॉर परिसराला आगीने कवेत घेतले होते. आगीच्या ज्वाळांमुळे येथील उष्णतेमध्ये भरच पडत असतानाच धूराच्या लोटात जिन्यांवर अडकलेल्या रहिवाशांना वेगाने खाली उतरविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरु होते. अग्निशमन दलाने यासाठी खासकरून उंच शिडीची मदत घेत रहिवाशांनी इमारतीखाली उतरविले. दरम्यान, क्रिस्टल टॉवरची आग शमविण्याचे काम दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरु असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.



केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची नावे
वीणा नवीन संपत, डॉली मैथी, राजु प्रकाश नरवडे, वाघरे गुलाम शेख सैफी, जयंत सदानंद सांवत, ज्योत्सना बामकिन बेरा, कार्तिक सुवर्णा, अक्षता सुवर्णा, शेख मश्कू सैफी, महेश सुवर्णा, चंद्रिका महेश सुवर्णा, संदिप मांजरे, अश्फाक खान, अझरुद्दीन अली शेख, नविनचंद्र संपत, हर्ष मधुकर तुपरे, सुनील सुरेश देसल, दानिश मेहतर, अब्दुल रेहमान शेख, मोहम्मद अहमद रफिक कुरेशी, प्रमोद राजेंद्र गिरसे.

- दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणा नीटशी कार्यान्वित नव्हती. शिवाय प्रत्येक मजल्यावरील इलेकट्रीक भाग बंद करण्यात आला नव्हता.
- सद्यस्थितीमध्ये दुर्घटनाग्रस्त इमारत वास्तव्य करण्यासाठी योग्य नसून, इमारतीचा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
- निष्काळजीपणा बाळगल्याप्रकरणी संबंधितांवर पोलीसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
- आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी प्रथमदर्शनी ही आग शॉर्टसकिर्टमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय दुर्घटनेचा तपास सुरु आहे.
- चार मृतांपैकी दोन जणांचे मृतदेह लिफ्टमध्ये तर दोन जणांचे मृतदेह लॉबीमध्ये आढळले.

Web Title: Fire on top of the crystal tower in Parel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.