Join us

कोरोनानंतर सुरु झालेल्या मॉल्सला अग्निशमन दलाची तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 5:26 PM

Mall after Corona : नियमांचे पालन करण्याच्या सूचना

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल होत असून, मुंबई ब-यापैकी पूर्वपदावर येत आहे. मुंबईत पूर्व पदावर येत असतानाच मुंबईची मॉल संस्कृतीदेखील खुली झाली आहे. मात्र खुल्या झालेल्या मॉल्सने अग्नि सुरक्षा विषय नियमांचे पालन करावे. तसेच मॉल्समध्ये कोणत्याही प्रकाराचे अनधिकृत बांधकाम करू नये. आणि तसे केले असल्यास विभागीय सहाय्यक आयुक्तांना संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत, असे म्हणत मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतल्या मॉल्सला सूचनांचे, नियमांचे पालन करण्याच्या नोटीस धाडल्या आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरातील मॉल आता खुले झाले असून, शहरासह उपनगरातील बहुतांश मॉलची तपासणी, पाहणी मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आली आहे. आणि या मॉल्सला सुचनांचे पालन करण्याची नोटीस बजाविण्यात आले आहे. कारण आता कोरोनानंतर अनेक मॉल्स खुले झाले असून, येथे नियम पाळणे बंधनकारक  आहे. अग्नि सुरक्षा महत्त्वाची आहे. नियम पाळले गेले नाहीत अथवा मॉलमध्ये अनधिकृत बांधकामे उभारले तर संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार विभागीय सहाय्यक आयुक्तांना आहेत, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी दिली. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या यादीनुसार, ज्या मॉलची पाहणी करण्यात आली आहे त्या मॉलमध्ये सध्या तरी २९ मॉलचा समावेश आहे.

--------------

नरिमन पॉईट : सीआर २मुंबई सेंटर : सिटी सेंटरदादर : नक्षत्रजुहू : डी.बीसांताक्रूझ : रिलायन्स रिटेल लिमिटेडसांताक्रूझ : मिलन मॉल गारमेंट हबखार : केनिल वर्थ शॉपिंग सेंटरसांताक्रूझ : फाय लाईफ प्रिमायसेसवांद्रे : रिलायन्स ट्रेंडस मेन स्ट्रीटवांद्रे : ग्लोबसवांद्रे : सुबुरबियाबोरीवली : दी झोन मॉलबोरीवली : गोकुळ शॉपिंग सेंटरबोरीवली : रिलायन्स मॉलकांदिवली : टेन्थ सेंट्रल मॉलबोरीवली : गोकुळ शॉपिंग आर्केडदहिसर : देवराजदहिसर : साई कृपामालाड : सेंट्रल प्लाझामालाड : इस्टर्न प्लाझामालाड : दी मॉलकांदिवली : अ‍ॅनेक्सकांदिवली : विष्णू शिवम मॉलकांदिवली : ठाकूर मुव्ही अँड शॉपिंग मॉलकांदिवली : ग्रोवर अँड वेलचेंबूर : के स्टार मॉलचेंबूर : क्युबिक मॉलपवई : हायको मॉलभांडूप : ड्रीम्स

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिकालॉकडाऊन अनलॉक