अग्निशमन केंद्राअभावी सुरक्षा ऐरणीवर! दुसऱ्या विभागातून यंत्रणा पोहोचण्यास होतो विलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 03:26 AM2019-05-07T03:26:52+5:302019-05-07T03:27:24+5:30
वर्सोवा यारी रोड येथील कविता अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील एका घरात रविवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात मोठी वित्तहानी झाली. या घटनांमुळे वर्सोव्यातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : वर्सोवा यारी रोड येथील कविता अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील एका घरात रविवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात मोठी वित्तहानी झाली. या घटनांमुळे वर्सोव्यातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जर वर्सोवा विभागात अग्निशमन केंद्र जवळपास असते, तर येथे वेळेत अग्निशमन दल पोहोचले असते आणि आग त्वरित नियंत्रणात आली असती, असे मत या इमारतीतील रहिवासी व समाजसेवक विवेक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
अंधेरी पश्चिम व वर्सोवा विधानसभा क्षेत्रासाठी एस.व्ही. रोडवर एकमेव अग्निशमन केंद्र आहे. रविवारी सकाळी कविता अपार्टमेंटला आग लागली तेव्हा ११.१५ ते ११.३३ पर्यंत आम्ही अंधेरी फायर ब्रिगेडला फोन करीत होतो. मात्र, फोन उचलला नाही. आग लागल्यानंतर सुमारे ४५ ते ५० मिनिटांनी फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या, अशी माहिती पाटील यांनी दिली.
वर्सोवा विधानसभेची लोकसंख्या २ लाख ७१ हजार १८४ इतकी आहे. येथे गननचुंबी इमारती, अनेक फिल्म स्टुडिओ, औद्योगिक वसाहती, मेट्रो अशा अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत. येथील वाढती लोकसंख्या आणि मुंबईत रोज घडणाºया आगीच्या घटना लक्षात घेता, येथे अग्निशमन केंद्र असावे, अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे. २०१२ ची पालिका निवडणूक, २०१४ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक, २०१७ ची पालिका निवडणूक आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातसुद्धा यावर येथील उमेदवारांचे लक्ष वेधले होते. मात्र आजमितीस तरी वर्सोव्याचे नागरिक अग्निशमन केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत.
‘लवकरच केंद्राची उभारणी होईल’