अतिधोकादायक इमारती ३१ मेपर्यंत पाडा !
By admin | Published: May 26, 2015 10:51 PM2015-05-26T22:51:01+5:302015-05-26T22:51:01+5:30
येत्या ३१ मेपर्यंत शहरातील सुमारे ५८ अतिधोकादायक इमारती पाडून टाकण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत.
ठाणे : मुंब्य्रात झालेल्या लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मान्सूनच्या काळात कोणतीही इमारत दुर्घटना घडू नये यासाठी येत्या ३१ मेपर्यंत शहरातील सुमारे ५८ अतिधोकादायक इमारती पाडून टाकण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून खोदण्यात आलेले रस्ते येत्या ३१ मेपर्यंत पूर्णपणे बुजवावेत अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. परंतु, तरीही रस्ते बुजविण्याच्या कामात काही कुचराई झाल्यास संबधींत कार्यकारी अभियंत्याना जबाबदार धरले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
३१ दिवसांच्या प्रदीर्घ रजेनंतर आयुक्त जयस्वाल हे सोमवारी कामावर रुजू झाले. रजेवर गेलेले आयुक्त पुन्हा येणारच नाहीत, अशाही चर्चा गेले काही दिवस पालिकेत रंगल्या होत्या. परंतु आयुक्तांनी कामावर पुन्हा हजेरी लावून त्याला पूर्णविराम दिला आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला धोकादायक इमारतींची संख्या ही २५६६ एवढी असून अतिधोकादायक इमारतींची संख्या ५८ च्या घरात आहे. या सर्वच इमारतींमध्ये तब्बल चार लाख कुटुंबांचे वास्तव्य आहे. पैकी अतिधोकादायक इमारतींमध्ये १०८२ कुटुंबांचे असून भोगवटाधारकांची संख्या ही ४८७६ एवढी आहे.
प्रभाग क्र.अतिधोकादायककुटुंबाची संख्याभोगवटाधारक
अधिकृतअनधिकृतअधिकृतअनधिकृतअधिकृतअनधिकृत
१) मुंब्रा-१३-४८८-२१५०
२) ६३,६४,६५-१४-३९१-१९५६
३) वर्तकनगर०१-----
४) कोपरी०२-०१-०४-
५)रायलादेवी-०३----
६) नौपाडा०४०१४६०४१८४१६
७) उथळसर०६०४-०७--
८) कळवा०४०३२२३९८६६४
९) माजिवडा०१-०१-०१-
१०) वागळे-०२-८३-४१५
सोमवारी सांयकाळी ४ ते रात्री ९.१५ वाजेपर्यंत आयुक्तांनी सर्व विभागाची ‘शाळा’ घेऊन, सर्वच अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यापुढे कोणत्याही कामात कुचराई चालणार नाही, हयगय खपवून घेतली जाणार नाही. सर्वच अतिधोकादायक इमारती ३१ मेपर्यंत पूर्णपणे पाडून टाकण्यात याव्यात असे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच धोकादायक इमारतींची पाहणी करुन ज्या इमारती धोकादायक स्थितीत आढळतील त्यांना नोटीस बजावण्यात येऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
डेडलाईन ३१ मे पर्यंत
४रस्ते खोदाईच्या कामांना १५ मे पर्यंतची परवानगी देण्यात आली असून खोदाईचे खड्डे ३१ मे पर्यंत बुजवावेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु ते न बुजल्यास आणि पावसाळ्यात या खड्यांमुळे काही दुर्घटना घडल्यास संबंधीत कार्यकारी अभियंत्यांना जबाबदार धरले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांच्या येणाऱ्या प्रत्येक तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यानुसार कारवाई करावी अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
४यापूर्वी महापालिकेने शहरातील इमारत दुर्घटनेत बाधीत झालेल्या रहिवाशांचे वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल हौसिंग स्कीममध्ये पुनर्वसन केले आहे. येथे १४४८ घरे असून ७४८ रहिवाशांचे येथे पुनर्वसन करण्यात आले असून आजच्या घडीला ७०० घरे रिकामी आहेत. .