सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 06:22 PM2024-05-01T18:22:40+5:302024-05-01T18:29:46+5:30
सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
Salman Khan: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याला इतर सहा आरोपींसोबत ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील इतर दोन आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेल्यानंतर आरोपीने हे कृत्य केले. आरोपी अनुज थापन याने खिडकीच्या जाळीला गळफास घेतला. सकाळी पोलीस राऊंडप झाला त्यावेळी सहा आरोपी कारागृहात होते. मात्र १२ नंतर एक आरोपी बाथरूमला गेला त्यावेळी त्याने अनुज थापन याने गळफास घेतल्याचे पोलिसांना सांगितले.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने तुरुंगातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. या आरोपींना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
गोळीबार प्रकरणात अनुजची चौकशी पूर्ण झालेली नव्हती. अनुज कडून बिष्णोई गॅगबाबत अधिक महत्वपूर्ण माहिती बाकी होते. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांसोबत कारागृहाची पाहणी करत आहेत.
गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी ८ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. यात बिश्नोई गँगच्या अनुज कुमार थापन याने पोलीस लॉक अपमध्ये आत्महत्या केली. थापन याला अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलला नेण्यात आले तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. थापन याच्यासह दोघांना २५ एप्रिलला अटक करण्यात आली होती. सलमान खानवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना या दोघांनी ४० काडतुसे पुरवली होती.