विलेपार्लेतील हॉटेलमध्ये गोळीबार
By admin | Published: October 23, 2016 04:24 AM2016-10-23T04:24:23+5:302016-10-23T04:24:23+5:30
हॉटेल मालकाकडून खंडणी वसूल करण्यासाठी गोळीबार करुन धमकाविण्याची घटना शुक्रवारी रात्री विले पार्ले येथील हॉटेल गझाली येथे घडली. गॅगस्टर रवी पुजारी टोळीतील
मुंबई : हॉटेल मालकाकडून खंडणी वसूल करण्यासाठी गोळीबार करुन धमकाविण्याची घटना शुक्रवारी रात्री विले पार्ले येथील हॉटेल गझाली येथे घडली. गॅगस्टर रवी पुजारी टोळीतील दोघांनी मोटारसायकलवरुन येवून हे कृत्य केले आहे. घटनास्थळी पुंगळी सापडली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेण्यात
येत आहे.
हॉटेल गझालीमध्ये साडेअकराच्या सुमारास तोंडावर कपडा व डोक्यावर काळी टोपी घातलेल्या एकजण काउंटरजवळ आला.तेथे असलेल्या वेटर मनोहर चौगुलेने मालकाबाबत विचारणा करीत त्याच्या हातात एक कार्ड दिले.
रिव्हॉल्वर त्याच्या मस्तकाला लावित ह्यये तेरे अंदर के बाप को देना और कॉल नही किया तो उपर भेज देंगेह्ण असे बजावित हवेत गोळीबार केला. त्यानंतर रेस्टॉरटच्या बाहेर मोटारसायकलवर थांबलेल्या इसमाबरोबर निघून गेला.या प्रकाराने चौगुलेने तातडीने मालकाला घडलेला प्रकार सांगत पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. रेस्टारंटमध्ये गाणी सुरु असल्यामुळे गोळीबाराचा आवाज कोणालाही ऐकू गेला नाही.
मात्र त्याठिकाणी बसविलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये हल्लेखोर अस्पष्ट दिसत आहे. (प्रतिनिधी)