अबब ! मलबार हिल परिसरात प्रत्येकी १०३ कोटींच्या २ ड्युप्लेक्सची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 06:35 AM2021-12-18T06:35:01+5:302021-12-18T06:36:25+5:30

कोरोना महामारीतून बांधकाम क्षेत्र सावरल्यानंतर आता मुंबईत आलिशान घरांच्या खरेदीचे मोठे सौदे पार पडत असल्याचे दिसत आहे.

firm Purchase of 2 duplexe flats worth Rs 103 crore each in Malabar Hill area mumbai | अबब ! मलबार हिल परिसरात प्रत्येकी १०३ कोटींच्या २ ड्युप्लेक्सची खरेदी

अबब ! मलबार हिल परिसरात प्रत्येकी १०३ कोटींच्या २ ड्युप्लेक्सची खरेदी

googlenewsNext

मुंबई : कोरोना महामारीतून बांधकाम क्षेत्र सावरल्यानंतर आता मुंबईत आलिशान घरांच्या खरेदीचे मोठे सौदे पार पडत असल्याचे दिसत आहे. मुंबईतील मलबार हिल येथील निर्माणाधीन इमारतीत दोन डुप्लेक्स घरांचा सौदा पार पडला. सेसेन या इमारतीत मुंबईतील एसएम डायकेम या कंपनीने ५१व्या आणि ५२व्या मजल्यावर डुप्लेक्स खरेदी केला आहे. ज्याची किंमत १०३.६५ कोटी रुपये आहे, तर दुसरा डुप्लेक्स ५३व्या आणि ५४व्या मजल्यावर पुण्यातील एबीएस रियलकॉन या कंपनीने खरेदी केला आहे.

काय आहे विशेष

  • ५१ व्या आणि ५२ व्या मजल्यावर १०३.६५ कोटी. ५३ आणि ५४ व्या मजल्यावर १०३.६५ कोटी रुपयांचे फ्लॅट्स.फ्लॅटचे क्षेत्रफळ ७,८०० चौरस फूट 
  • ५ गाड्यांची पार्किंग
  • ३.४० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले
     

मुद्रांक शुल्कावर ३ टक्के सवलत

  • मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा परिसर असून, मागील काही दिवसांमध्ये येथे आलिशान घरांचे अनेक मोठे व्यवहार पार पडले. 
  • बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी येण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत दिली होती.
  • ३१ मार्च २०२१ रोजी या घर खरेदीची नोंदणी करण्यात आली होती. हे घर खरेदी करताना खरेदीदारांना मुद्रांक शुल्कावर ३ टक्के सवलत मिळाली. 

Web Title: firm Purchase of 2 duplexe flats worth Rs 103 crore each in Malabar Hill area mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई