पनवेल-ठाणे पहिली एसी लोकल उद्यापासून ट्रान्स हार्बरवर धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:47 AM2020-01-30T01:47:03+5:302020-01-30T01:47:25+5:30
पहिली एसी लोकल सकाळी ५.४४ वाजता पनवेल-ठाणे धावेल, तर सकाळी ६.६४ वाजता ठाणे-पनवेल धावेल.
मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरून ३१ जानेवारीपासून एसी लोकल नियमित धावेल. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरून दोन्ही दिशेकडून एसी लोकलच्या एकूण १६ फेऱ्या होतील. मात्र, शनिवार, रविवारी एसी लोकल धावणार नाही. पहिली एसी लोकल सकाळी ५.४४ वाजता पनवेल-ठाणे धावेल, तर सकाळी ६.६४ वाजता ठाणे-पनवेल धावेल.
मध्य रेल्वे विभागात अनेक वर्षांपासून एसी लोकल धावेल, यावर चर्चा होत होत्या.तांत्रिक कारणामुळे एसी लोकल चालविणे शक्य होत नव्हते. परिणामी, एसी लोकलची उंची कमी करून पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे. सोमवार ते शुक्रवार नियमित वेळेत ही एसी लोकल धावेल, तर शनिवारी एसी लोकलऐवजी सामान्य लोकल धावेल. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकलच्या फेºया रद्द करण्यात आल्या आहेत.
एसी लोकलचे तिकीट दर रुपयांमध्ये (ठाणे स्थानकापासून)
स्थानक किमी तिकीट मासिक
(सिंगल जर्नी)
ऐरोली ६ ७० ७५५
रबाळे ९ ७० ७५५
घणसोली ११ ९५ १०१५
कोपरखैरणे १३ ९५ १०१५
तुर्भे १६ १४० १४५५
जुईनगर १८ १४० १५००
नेरुळ २१ १४० १५१०
सिवूड २२ १४० १५१०
बेलापूर २४ १४० १५१०
खारघर २७ १८५ १९४०
मानसरोवर ३० १८५ १९७५
खांडेश्वर ३२ १८५ १९८५
पनवेल ३५ १८५ १९८५
सुटण्याची वेळ
पनवेल-ठाणे सकाळी ५.४४
ठाणे-नेरुळ सकाळी ६.४६
नेरुळ-ठाणे सकाळी ७.२९
ठाणे-वाशी सकाळी ०८.०८
वाशी-ठाणे सकाळी ८.४५
ठाणे-नेरुळ सकाळी ९.१९
नेरुळ-ठाणे सकाळी ९.५७
ठाणे-बेलापुर सकाळी १०.४०
पनवेल-ठाणे दुपारी ४.१४
ठाणे- नेरुळ सायंकाळी ५.१६
नेरुळ-ठाणे सायंकाळी ५.५४
ठाणे-नेरुळ सायंकाळी ६.२९
नेरुळ-ठाणे सायंकाळी ७.०८
ठाणे-पनवेल सायंकाळी ७.४९
पनवेल-ठाणे रात्री ८.५२
ठाणे-पनवेल रात्री ९.५४
- एसी लोकलची उंची कमी करून तसेच सर्व तांत्रिक समस्या दूर करून आता पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावरून धावेल.