मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरून ३१ जानेवारीपासून एसी लोकल नियमित धावेल. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरून दोन्ही दिशेकडून एसी लोकलच्या एकूण १६ फेऱ्या होतील. मात्र, शनिवार, रविवारी एसी लोकल धावणार नाही. पहिली एसी लोकल सकाळी ५.४४ वाजता पनवेल-ठाणे धावेल, तर सकाळी ६.६४ वाजता ठाणे-पनवेल धावेल.मध्य रेल्वे विभागात अनेक वर्षांपासून एसी लोकल धावेल, यावर चर्चा होत होत्या.तांत्रिक कारणामुळे एसी लोकल चालविणे शक्य होत नव्हते. परिणामी, एसी लोकलची उंची कमी करून पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे. सोमवार ते शुक्रवार नियमित वेळेत ही एसी लोकल धावेल, तर शनिवारी एसी लोकलऐवजी सामान्य लोकल धावेल. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकलच्या फेºया रद्द करण्यात आल्या आहेत.एसी लोकलचे तिकीट दर रुपयांमध्ये (ठाणे स्थानकापासून)स्थानक किमी तिकीट मासिक(सिंगल जर्नी)ऐरोली ६ ७० ७५५रबाळे ९ ७० ७५५घणसोली ११ ९५ १०१५कोपरखैरणे १३ ९५ १०१५तुर्भे १६ १४० १४५५जुईनगर १८ १४० १५००नेरुळ २१ १४० १५१०सिवूड २२ १४० १५१०बेलापूर २४ १४० १५१०खारघर २७ १८५ १९४०मानसरोवर ३० १८५ १९७५खांडेश्वर ३२ १८५ १९८५पनवेल ३५ १८५ १९८५सुटण्याची वेळपनवेल-ठाणे सकाळी ५.४४ठाणे-नेरुळ सकाळी ६.४६नेरुळ-ठाणे सकाळी ७.२९ठाणे-वाशी सकाळी ०८.०८वाशी-ठाणे सकाळी ८.४५ठाणे-नेरुळ सकाळी ९.१९नेरुळ-ठाणे सकाळी ९.५७ठाणे-बेलापुर सकाळी १०.४०पनवेल-ठाणे दुपारी ४.१४ठाणे- नेरुळ सायंकाळी ५.१६नेरुळ-ठाणे सायंकाळी ५.५४ठाणे-नेरुळ सायंकाळी ६.२९नेरुळ-ठाणे सायंकाळी ७.०८ठाणे-पनवेल सायंकाळी ७.४९पनवेल-ठाणे रात्री ८.५२ठाणे-पनवेल रात्री ९.५४- एसी लोकलची उंची कमी करून तसेच सर्व तांत्रिक समस्या दूर करून आता पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावरून धावेल.
पनवेल-ठाणे पहिली एसी लोकल उद्यापासून ट्रान्स हार्बरवर धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 1:47 AM