मुंबई : पश्चिम बंगालमधील ननवरील सामूहिक बलात्कारात सहभागी असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी काल मध्यरात्री तीनच्या सुमारास वाडीबंदरच्या झोपडपट्टीतून अटक केली. महोम्मद सलीम सिकंदर शेख असे या आरोपीचे नाव असून त्याच्या शोधार्थ बंगालचे राज्य गुन्हे अन्वेषण पथक(सीआयडी) मुंबईत दाखल झाले होते. गुन्हे शाखेचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार या गंभीर गुन्ह्यातली ही पहिलीच अटक आहे. पश्चिम बंगाल सरकारने या प्रकरणाचा तपास तेथील सीआयडीकडे सोपविला. सीआयडीला परिसरातल्या सीसीटीव्हींमध्ये गुन्हयात सहभागी असलेल्या चार तरूणांचे चेहेरे स्पष्ट दिसले. त्यानुसार या चौघांवर तपास केंद्रीत झाला. दरम्यान, मोबाईल लोकेशनवरूनही सीआयडीने काही तरूणांचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेने वाडीबंदर परिसरातून अटक केलेला शेख हाही त्यातलाच.मोबाईल लोकेशनवरून तो मुंबईतल्या नागपाडा परिसरात असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पश्चिम बंगाल सीआयडीचे उपाधिक्षक टी. दास आपल्या पथकासह मुंबईत धडकले. त्यांनी आरोपी शेखला अटक करण्यासाठी गुन्हे शाखेची मदत घेतली. त्यानुसार युनिट एकचे वरिष्ठ निरिक्षक अवधूत चव्हाण, निरिक्षक संतोष बागवे, एपीआय दशरथ विटकर, तुकाराम देऊळकर आणि पथकाने नागपाडा पिंजून काढला. मात्र दास यांनी सोबत आणलेल्या पत्त्यावर शेख सापडला नाही. अखेर निरिक्षक बागवे आणि पथकाने आपल्या खबऱ्यांचे जाळे शेखच्या मागे लावले. एका खबऱ्याच्या माहितीनुसार बागवे आणि पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वाडीबंदर झोपडपटटीत सापळा रचून शेखला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)च्भाऊच्या धक्क्यावर हमाली करणारा शेख मूळचा पश्चिम बंगालाचा. मात्र तो बांग्लादेशी असावा, असा संशय बंगालच्या सीआयडीला आहे. त्यानुसार त्याची कसून चौकशी सुरू आहे.च्गेल्या अनेक दिवसांपासून शेख मुंबईतून बेपत्ता होता. तो कोलकात्याला गेला होता. गुन्हयानंतर काही दिवस पश्चिम बंगालमध्येच दडून राहिला. संधी मिळताच मुंबईत आला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तो तीन दिवसांपुर्वीच मुंबईत आला होता. मुंबईत शेखविरोधात गुन्हयांची नोंद नाही. मात्र अन्य ठिकाणी असू शकते, असा दावा मुंबई पोलीस करतात.च्ताब्यात घेतल्यानंतर शेखने आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगाल सीआयडीने सोबत आणलेले पुरावे दाखविल्यानंतर त्याची बोबडी वळली. बंगाल पोलिसांनी तिथल्या तिथे त्याच्याकडे महत्वाच्या मुद्यांवर चौकशी केली. अन्य आरोपींची नावे, ठावठिकाणा आदी प्रश्नांचा त्यात सहभाग होता, असे समजते. त्याच्याच माहितीवरून बंगाल पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केल्याचीही माहिती मिळते. तो पोलिसांचा खबऱ्याशेख हा पोलिसांचा खबऱ्या होता. त्याने जेजे मार्ग आणि आसपासच्या पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांना गुन्हयाची उकल करण्यात मदत केल्याची किंवा गुन्हेगारांची माहिती पुरविली होती, असे एका अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.
ननवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी पहिली अटक
By admin | Published: March 27, 2015 1:30 AM