प्राची सोनवणे, नवी मुंबईशहरातील २०९ तरुण उमेदवारांपैकी १८ तरुण उमेदवार विजयी ठरले. शहराचे भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यंग ब्रिगेडला मतदारांचा चांगलाच पाठिंबा मिळाला. राजकारणातल्या या संधीत त्यांना यश मिळाल्याने तरुणांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. प्रभाग क्र. ३८ कोपरखैरणे नोड - ३ मधील शिवसेनेच्या मेघाली मधुकर राऊत या सर्वात कमी वयाच्या नगरसेविका ठरल्या.घराण्यांचा राजकीय वारसा जपणारे हे तरुण उमेदवार आता नगरसेवकाच्या भूमिकेत वावरणार आहे. राजकारणातला फारसा अनुभव नसला तरी, त्यांच्यातली काम करण्याची वृत्ती आणि एक नवा अंदाज पाहता त्यांचा विजय झाल्याचे दिसून येते. या विजयी उमेदवारांमध्ये २१ ते ३० या वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. निवडून आलेले हे तरुण शहराचा विकास घडविण्यासाठी नक्कीच हातभार लावतील आणि चांगले बदल घडवून आणतील, अशी अपेक्षा आहे. तरुणांमध्ये प्रभाग क्रमांक ३ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपा राजेश गवते यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. ३२५२ मते मिळून गवते यांनी दिघामधून विजय मिळविला.
पहिल्याच बॉलवर १८ जणांचा सिक्सर
By admin | Published: April 24, 2015 2:57 AM