Join us

आधी ९९ हजारांचा फटका... पुढे तेच पैसे मिळविण्यासाठी लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:10 AM

मुंबई : ऑनलाइन व्यवहारात आधी ९९ हजार रुपये अडकले होते. तेच पैसे परत मिळविण्यासाठी पतीला एक लाख ३९ हजार ...

मुंबई : ऑनलाइन व्यवहारात आधी ९९ हजार रुपये अडकले होते. तेच पैसे परत मिळविण्यासाठी पतीला एक लाख ३९ हजार रुपये गमाविण्याची वेळ ओढवली आहे. या प्रकरणी दादर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दादर परिसरात राहणारे तक्रारदार सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे; तर पत्नी घरकाम करते. १७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी पत्नीच्या खात्यावर पेटीएमद्वारे ९९ हजार रुपये पाठविले. पत्नीला हे पैसे न मिळाल्याने त्यांनी अधिक तपासणी केली. व्यवहारात ते पोहोच झाल्याचे दाखवीत होते. त्यांनी ‘गुगल’वरून ग्राहक सेवा क्रमांक मिळवून त्यावर संपर्क साधला. संबंधित कॉलधारक ठगाने हेच पैसे परत मिळवून देण्याच्या नावाखाली वेगवेगळी कारणे पुढे करीत आणखी एक लाख ३९ हजार ९८६ रुपये उकळले. पुढे आणखी पैसे मागताच त्यांना संशय आला. त्यांनी व्यवहार थांबवून याबाबत पोलिसांकड़े धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गेल्या आठवड्यात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.