फर्स्ट क्लास पासने एसी लोकल प्रवास, आठवड्याभरात लोकलची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:00 AM2017-12-11T05:00:28+5:302017-12-11T05:00:55+5:30

बहुप्रतिक्षित वातानुकूलित लोकलबाबत दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. प्रथम श्रेणीच्या पासधारकांना वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येणार आहे. तिकीट दराचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने मंजुरीसाठी दिल्ली दरबारी पाठवला आहे.

 First class passes, AC local travel, local checks in a week | फर्स्ट क्लास पासने एसी लोकल प्रवास, आठवड्याभरात लोकलची तपासणी

फर्स्ट क्लास पासने एसी लोकल प्रवास, आठवड्याभरात लोकलची तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बहुप्रतिक्षित वातानुकूलित लोकलबाबत दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. प्रथम श्रेणीच्या पासधारकांना वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येणार आहे. तिकीट दराचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने मंजुरीसाठी दिल्ली दरबारी पाठवला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. येत्या आठवड्यात एसी लोकलची रेल्वेच्या सुरक्षा विभागाकडून तपासणीदेखील होणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील ३५ लाख प्रवाशांपैकी सुमारे ४ लाख प्रवासी हे फर्स्ट क्लास पासधारक आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे या प्रवाशांना तरी दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते डहाणू दरम्यान दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करतात, त्यातील ११.३१ टक्के प्रवासी मासिक, त्रैमासिक व सहामाही व वार्षिक
प्रथम श्रेणीचे पासधारक आहेत. प्रथमश्रेणीच्या पासधारकांकडून प्रवास करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले
जाणार नसल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान एसी लोकल चालवण्यात येणार आहेत. वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा यासाठी लोकलचे भाडेदेखील ५ किलोमीटरपर्यंत १० रुपये व विरार ते चर्चगेट प्रवासासाठी ८५ रुपये पर्यंत करण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने ठेवला आहे. दिवसातून ६ ते ८ फेºया चालवण्यात येणार असून वर्दळीच्या वेळीही चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा मानस आहे. लोकलच्या बाह्यभागावर आमची मुंबई थीमच्या माध्यमातून मुंबईचे दर्शन घडणार आहे. आॅटोमॅटिक दरवाजे, टॉक बॅक
प्रणाली यंत्रणा, ६ हजार प्रवासी क्षमता असलेल्या या लोकलमध्ये १ हजार २८ प्रवासी बसून प्रवास करू शकतात. वातानुकूलित लोकलने प्रवास करण्यासाठी मुंबईकर उत्सुक आहेत. त्यामुळे एसी लोकलला तुफानी प्रतिसाद लाभेल, असा विश्वास पश्चिम रेल्वेने व्यक्त केला आहे.

जागते रहो...
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी
शुक्रवारी रात्री ११.१५ वाजता चर्चगेट स्थानकाला भेट दिली. या वेळी कोणत्याही स्वरूपाचे व्हीआयपी कवच त्यांच्या समवेत नव्हते. रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता समीर झवेरी याप्रसंगी उपस्थित होते. या वेळी महिलांच्या डब्यात पोलीस रक्षक नियुक्त आहे की नाही याची पाहणी केली. एरवी ‘मोदी कोट’ पेहराव परिधान करणाºया रेल्वेमंत्र्यांनी टी-शर्टवर स्थानकांची पाहणी केली. यामुळे रेल्वेमंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या मुंबईतील रेल्वे अधिकारी वर्गाला जागते रहो, असा इशारा दिल्याची चर्चा रेल्वे वर्तुळात रंगत आहे.

Web Title:  First class passes, AC local travel, local checks in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.