आधी जबरदस्ती... नंतर आत्महत्येची भीती घालत अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:06 AM2021-04-02T04:06:39+5:302021-04-02T04:06:39+5:30

अखेर गुन्हा दाखल, वडाळा पोलिसांकडून तपास सुरू गुन्हा दाखल, वडाळा पोलिसांकड़ून तपास सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आत्महत्या ...

First coercion ... then atrocities for fear of suicide | आधी जबरदस्ती... नंतर आत्महत्येची भीती घालत अत्याचार

आधी जबरदस्ती... नंतर आत्महत्येची भीती घालत अत्याचार

Next

अखेर गुन्हा दाखल, वडाळा पोलिसांकडून तपास सुरू

गुन्हा दाखल, वडाळा पोलिसांकड़ून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आत्महत्या करण्याची धमकी देत १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

वडाळा परिसरात १९ वर्षीय तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ती राहण्यास असलेल्या इमारतीतील ४० वर्षीय आरोपीच्या घरी तिची मामासोबत ये-जा सुरू होती. मे २०२०मध्ये तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तरुणीने याबाबत कुणाकडे वाच्यता करू नये यासाठी आरोपीने आत्महत्या करण्याची भीती घातली.

तरुणीने याबाबत कुणाला सांगितले नाही. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात माफी मागायची असल्याचे सांगत तरुणीला घरी बोलावून घेतले. तरुणी घरी जाताच तिच्यावर बलात्कार केला. यावेळीही हातावर वार केले. पुढे बलात्काराचा व्हिडिओ करून धमकाविण्यास सुरुवात केली. जूनमध्ये तो जहाजावर कामासाठी निघून गेला. पुढे, आत्महत्या करणार असल्याचे सांगत व्हॉट्सॲप वरून संवाद सुरू होता. पुन्हा आत्महत्येची धमकी देत, चॅटिंग करण्यास भाग पाडले. सुसाइट नोटमध्ये तुझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करणार जेणेकरून शिक्षा होईल अशी भीतीही तरुणीला वेळोवेळी घालण्यात आली. शिवाय ते व्हिडिओही सोशल मीडियावर पाठविण्याची धमकी देत, नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले आहे.

यातून सुटका होत नाही तोच, ३० मार्चमध्ये त्याच्या पत्नीने पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर तरुणीच्या आईलादेखील शिवीगाळ करताच तरुणीने बुधवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

Web Title: First coercion ... then atrocities for fear of suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.