Shiv Bhojan Plate : 'पहिल्याच दिवशी 11,417 जणांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 05:44 PM2020-01-27T17:44:00+5:302020-01-27T17:58:34+5:30

Shiv Bhojan Plate : आतापर्यंत राज्यात 122 शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून

On the first day, 11,417 people took advantage of Shiv Bhojan plate, Says chhagan bhujbal | Shiv Bhojan Plate : 'पहिल्याच दिवशी 11,417 जणांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ'

Shiv Bhojan Plate : 'पहिल्याच दिवशी 11,417 जणांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ'

googlenewsNext

मुंबई - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात काल शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात पहिल्याच दिवशी 11 हजार 417 नागरिकांनी या भोजनाचा लाभ घेतल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. भुजबळ यांनी नाशिक येथून शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला होता. राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु केल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. 

आतापर्यंत राज्यात 122 शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून गरीब जनतेला 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवभोजन ही आमच्या शासनाची प्रमुख योजना असून तिची राज्यात काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण विभागाला सूचना देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

शिवभोजन योजनेत अकोला जिल्ह्यात २, अमरावतीमध्ये ३, बुलढाण्यात ३, वाशिममध्ये २, औरंगाबाद मध्ये ४, बीड मध्ये १, हिंगोलीत १, जालन्यात २, लातूर मध्ये १, नांदेडमध्ये ४, उस्मानाबाद मध्ये ३, परभणीमध्ये २, पालघरमध्ये ३,  रायगड मध्ये ४, रत्नागिरीमध्ये ३, सिंधुदूर्ग मध्ये २, परळ ३, अंधेरी ३, वडाळा २, ठाणे ७, कांदिवली २, भंडारा २, चंद्रपूर ३, गडचिरोली १, गोंदिया २, नागपूर ७, वर्धा २, अहमदनगर ५, धुळे ४, जळगाव ७, नंदूरबार २,  नाशिक ४, कोल्हापूर ४, पुणे १०, सांगली ३, सातारा ४, सोलापूरात ५  अशी केंद्रे सुरु झाली आहेत. संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री महोदयांच्या हस्ते रविवारी शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, ज्या खानावळ, स्वंयसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट, मेसच्या माध्यमातून शिवभोजन योजना राबविली जात आहे. म्हणजेच ज्या केंद्रांना योजनेची अंमलबजावणी करण्याची मान्यता देण्यात आली आहे त्या केंद्रातून योजनेअंतर्गत दुपारी 12 ते 2 यावेळेत जेवण उपलब्ध करून दिले जाते.

Web Title: On the first day, 11,417 people took advantage of Shiv Bhojan plate, Says chhagan bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.