नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी टिटवाळ्यात पाच लाख भाविक
By admin | Published: January 1, 2015 11:13 PM2015-01-01T23:13:33+5:302015-01-01T23:13:33+5:30
नविन वर्षाची सुरूवात देवदर्शनानेकरून नविन संकल्प व नविन विचार यांची सांगडबांधण्यासाठी टिटवाळ्यात बाप्पाचे दर्शन घेण्याकरीता लोकांची व भाविकांची गर्दी उसळली.
उमेश जाधव - टिटवाळा
नविन वर्षाची सुरूवात देवदर्शनानेकरून नविन संकल्प व नविन विचार यांची सांगडबांधण्यासाठी टिटवाळ्यात बाप्पाचे दर्शन घेण्याकरीता लोकांची व भाविकांची गर्दी उसळली. त्यात गणपती मंदिरात रात्री १.०० वा.पासूनच भाविक भक्तांनी गर्दी केली होती.
नविन वर्षाची सुरूवात व एकादशी असा दुहेरी योगयामुळे येथे गर्दीचा उचांक पहावयास मिळाला. सुमारे पाच लाखावर भाविकांनी गणेशाचे दर्शन घेतल्याचे मंदिर विश्वस्त योगेश जोशी यांनी सांगितले.
या ठिकाणी ठाणे, मुलंड, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, आंबरनाथ, बदलापूर, कर्जत, मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी ठिकाणहून भाविक आले होते. परंतू सध्या टिटवाळ्यात रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता जागोजागी खोदला होता. त्यामुळे भाविकांना वाहतूककोंडी व पायी चालतांना खूप त्रास सहन करावा लागला. आजच्या गर्दीने उंचाक तोडला. अशा प्रकारची गर्दी अंगारक चतुर्थीला देखीत नसते असे मत येथील पूजा साहित्य विक्र ेत्यांनी व्यक्त केले. संपूर्ण मुख्य रस्त्यावर भाविकांची व वाहनांची गर्दी दिसून येत होती. वाहने लावायला जागा शिल्लक राहीली नव्हती. टिटवाळा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच अनिरूध्द बापूंचे सेवक, होमगार्ड व देवस्थानंची सुरक्षा व्यवस्था आपली कर्तव्य बजावतांना दिसून आली.
ला राम राम करत नवीनवर्षे २०१५ चे स्वागत करून लोकांनी आनंद उत्सव साजरा केला. नविन वर्षाची सुरूवात चांगली व्हावी याकरिता टिटवाळा येथील गणपती बाप्पाच्या मंदिरात भाविकांची कमालीची गर्दी दिसून आली. त्यात एकादशी आसल्यामुळे येथील विठ्ठल मंदिरातही गर्दी होती. रात्री पासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. पहाटे चारनंतर देवाला आभिषेक घातल्या नंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
अशा प्रकारची गर्दी आम्ही कधी पाहिली नव्हती. पाच लाखाच्या आसपास भाविक भक्त आले असावेत. आमची रात्री पासून बंदोबस्त करतांना दमछाक उडाली. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
- व्यंकट आंधळे,
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, टिटवाळा पो.स्टे.