प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना २.०४ कोटींचे मिळाले पॅकेज, गुगल, मायक्रोसॉफ्ट, उबेर कंपन्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:29 AM2021-12-02T11:29:25+5:302021-12-02T11:31:59+5:30

IIT Mumbai: आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी भरघोस पॅकेजेस् मिळाली आहेत. यावर्षी स्थानिक कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी ६२ लाखांची ऑफर तर आंतरराष्ट्रीय कंपनीकडून २.७४ लाख यूएस डॉलरची ऑफर मिळाली

On the first day of placement, students received a package of Rs 2.04 crore, participation of Google, Microsoft, Uber companies. | प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना २.०४ कोटींचे मिळाले पॅकेज, गुगल, मायक्रोसॉफ्ट, उबेर कंपन्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना २.०४ कोटींचे मिळाले पॅकेज, गुगल, मायक्रोसॉफ्ट, उबेर कंपन्यांचा सहभाग

Next

मुंबई : आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी भरघोस पॅकेजेस् मिळाली आहेत. यावर्षी स्थानिक कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी ६२ लाखांची ऑफर तर आंतरराष्ट्रीय कंपनीकडून २.७४ लाख यूएस डॉलरची ऑफर मिळाल्याची माहिती आयआयटी, मुंबईकडून देण्यात आली आहे. प्री प्लेसमेंट ऑफर्समध्येही जास्त पॅकेज मिळवणाऱ्या व त्या ऑफर्स मान्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्यावर्षीच्या तुलनेत जास्त असल्याची माहिती आयआयटी प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे.

आयआयटी, मुंबई प्लेसमेंटच्या सीझनला सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी सर्वात जास्त पॅकेज देणाऱ्या कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इंस्टुरमेंट, क्वॉलकम, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप अशा कंपन्यांचा समावेश होता. पहिल्या दिवशी २८ कंपन्यांनी प्लेसमेंट ऑफर्समध्ये आपला सहभाग दर्शविला. आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून २०१ प्री प्लेसमेंट्स ऑफर्स स्वीकारण्यात आल्याची माहिती प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे.

मिलेनियमकडून स्थानिक ऑफर्समध्ये सगळ्यात जास्त म्हणजे ६२ लाखांचे पॅकेज देण्यात आले. त्यानंतर वर्ल्डक्वांटकडून ५१. ७१ लाखांचे तर ब्लॅकस्टोनकडून ४६.६२ लाखांचे पॅकेज आयआयटी विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑफर्समध्ये उबेर आणि रुब्रिक अशा कंपन्यांकडून ऑफर्स आल्याची माहिती सेलकडून देण्यात आली.

रिक्रुटर्स कंपन्यांनी आयटी, सॉफ्टवेअर, कोअर इंजिनिअरिंग या क्षेत्रातील ऑफर्समध्ये प्राधान्य दिले आहे. प्लेसमेंट सेलला आणखी काही कंपन्यांची निश्चिती होत असून, पुढील दिवसात आणखी काही कंपन्यांकडून ऑफर्स येणार असल्याचे आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेलकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: On the first day of placement, students received a package of Rs 2.04 crore, participation of Google, Microsoft, Uber companies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.