Join us

मध्य रेल्वेचे पहिले ई-शौचालय कोइम्बतूर एक्स्प्रेसमध्ये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 1:12 AM

जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने सोमवारी मध्य रेल्वेने पहिल्यांदाच स्वयंचलित ई-शौचालय सुरू केले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोइम्बतूर एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीत हे ई-शौचालय प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आले आहे.

मुंबई : जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने सोमवारी मध्य रेल्वेने पहिल्यांदाच स्वयंचलित ई-शौचालय सुरू केले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोइम्बतूर एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीत हे ई-शौचालय प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आले आहे.सोमवारी जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने ट्रेन क्रमांक ११०१३ लोकमान्य टिळक टर्मिनस- कोइम्बतूर एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीत एका शौचालयाच्या जागी ई-शौचालय कार्यान्वित केले.शौचालयाचा दरवाजा उघडताच सेंसरच्या मदतीने स्वयंचलित फ्लॅशची सुविधा, प्रत्येकी ५ वापरानंतर शौचालयातील फ्लोरिंगची स्वयंचलित साफसफाई, टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले शौचालयांचे फ्लोरिंग आणि भिंत ही ई-शौचालयांची वैशिष्ट्ये आहेत.

टॅग्स :रेल्वे