Join us

ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाली पहिली इलेक्ट्रीक एसी बस, चार इलेक्ट्रीक स्कुटरही पालिकेच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 4:58 PM

ठाणेकरांच्या सेवेत पहिली प्रदुषणविरहित इलेक्ट्रीक बस दाखल झाली आहे. पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ही बस आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रीबीन कापून ठाणेकरांसाठी उपलब्ध करुन दिली. तसेच यावेळी चार इलेक्ट्रीक स्कुटरही पालिकेच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

ठळक मुद्देटप्याटप्याने १०० बसेस होणार दाखलसाध्या दरातच प्रवासाची संधी

ठाणे - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, ठाणे महापालिकेने इलेक्ट्रीक बस ठाणेकरांच्या सेवेत दाखल केली आहे. तसेच चार इलेक्ट्रीक स्कुटर देखील पालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. महापालिकेच्या आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या बस आणि स्कुटरचा शुभारंभ केला. येत्या पाच ते सहा महिन्यात टप्याटप्याने १०० इलेक्ट्रीक बसेस ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार असून पहिल्या टप्यात १० बसेस येणार आहेत.              ठाणेकरांच्या सेवेसाठी सेमीलोओफ्लोअर इलेक्ट्रीक हायब्रीड बस घेतल्या जाणार असून, त्यानुसार मंगळवारी पहिली बस ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाली. पीपीपी तत्वावर या बसेस पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे पालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. त्यानुसार १०० बस घेण्याचा पालिकेचा मानस असून पहिल्या टप्यात १० बस घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्यात ज्या १० बस येणार आहेत, त्या आनंद नगर ते घोडबंदर गायमुख या मार्गावर धावणार असून प्रवाशांना साध्या दरातच एसी बसची सुविधा उपलब्ध होणार आहे. या बसमध्ये मागील बाजूस संबधींत एजेन्सी वायफाय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या बस खाजगी माध्यमातून घेतल्या जात असून त्यावर चालक, वाहक, चार्जींग आॅपरेटर हे संबधींत एजेन्सीचे असणार आहेत. महापालिका केवळ त्यांच्यासाठी जागा देणार असून बसथांब्यावर चार्जींग सेंटर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. आरीटीआय निमानुसार तिकीटाचे दर आकारण्यात येणार असून, त्या बसवर केल्या जाणाऱ्या जाहीरातीमधील उत्पन्नाचा काही हिस्सा हा पालिकेला मिळणार आहे. त्यानुसार १०० बसेसपोटी पालिकेला महिनाकाठी १० लाखांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे.दरम्यान पर्यावरण पुरक असलेल्या चार इलेक्ट्रीक स्कुटर देखील ठाणे महापालिकेच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

या बसेसचा रुट ठरविण्याचा अधिकार हा संबधींत एजेन्सीला असणार आहे. प्रदुषणविरहित या बसेस आहेत. टप्याटप्याने १०० बसेस सेवेत दाखल होणार आहेत. यासाठीचे चार्जींग स्टेशन आनंद नगर जकात नाका येथे सुरु करण्यात आले आहे. तसेच बाळकुम येथे देखील चार्जींग स्टेशनचे काम सुरु आहे. तर अन्य दोन जागांवर देखील चार्जींग स्टेशन उभारण्यात येणार आहे.(संजीव जयस्वाल - आयुक्त, ठामपा) 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकावीजेवर चालणारं वाहन