विद्युतवर चालणारी पहिली बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 05:41 PM2019-09-05T17:41:20+5:302019-09-05T17:41:26+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात विद्युतवर चालणाऱ्या पहिल्या बसचे लोकार्पण आणि मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयाचे भूमिपुज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) करण्यात आले आहे.
मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात विद्युतवर चालणाऱ्या पहिल्या बसचे लोकार्पण आणि मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयाचे भूमिपुज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) करण्यात आले आहे.
सततच्या इंधन दरवाढीमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी विद्युत बस घेण्याचा निर्णय परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी घेतल्याचे सांगितले. तसेच ही विद्युत बस दादर ते पुणे दरम्यान धावणार असून या बसचं नाव 'शिवाई' असे ठेवण्यात आले आहे.
तसेच मुंबई सेंट्रल येथील एसटीचे मुख्यालय 1965पासून कार्यरत असून हे मुंबईतील एक महच्वाचं बस स्थानक म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये महामंडळाचा विस्तार झाला असून प्रनाशांसोबतच गाड्यांची संख्या देखील वाढली आहे. तसेच तुलनेने आता सध्याची मुख्यालयाची इमारतीमधील जागा कमी पडू लागली आहे. त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष इमारतीचे वारंवार दुरुस्ती देखभालचा देखील खर्च सतत वाढत असल्याने जुन्या इमारतीच्याच जागी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात तब्बल 49 मजली इमारत येथील मोकळ्या जागेवर उभी राहणार आहे .या इमारतीमध्ये तळमजल्यावर उपहारगृह प्रस्तावित आहे.१ ते ८ मजले इमारतीतील वाहनांच्या पार्किंग साठी उपलब्ध असणार आहेत .त्यानंतर 9 ते 14 मजल्या पर्यंत एसटी महामंडळाचे सध्याचे मध्यवर्ती कार्यालय स्थलांतरित होणार आहे.15 ते 49 मजले शासनाच्या विविध विभागांना भाडयाने देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे भाड्याच्या स्वरूपामध्ये महामंडळाला कायमचा महसूल मिळत राहील .तसेच मुंबई शहरातील अनेक शासनाची कार्यालय या एकाच इमारतीत स्थलांतरित झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला एकाच छताखाली शासनाच्या अनेक कार्यालयांमध्ये जा-ये करणे सुलभ होणार आहे.