बेस्ट फाइव्हऐवजी आता फर्स्ट फाइव्ह; शालेय शिक्षण विभागाचा नवीन बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:40 AM2019-06-22T04:40:00+5:302019-06-22T04:40:08+5:30

अकरावी प्रवेश निश्चित करताना आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना बसणार फटका

First Five Instead Of The Best Five; A new change of school education department | बेस्ट फाइव्हऐवजी आता फर्स्ट फाइव्ह; शालेय शिक्षण विभागाचा नवीन बदल

बेस्ट फाइव्हऐवजी आता फर्स्ट फाइव्ह; शालेय शिक्षण विभागाचा नवीन बदल

Next

मुंबई : अकरावी प्रवेशांमध्ये होणारे बदल काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकीकडे अकरावीच्या ९८ महाविद्यालयांत जागा वाढविण्यात आल्या. मात्र, अद्याप अकरावीच्या एकूण जागा घोषित करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पालक त्रस्त आहेत. आता दुसरीकडे आयसीएसईच्या पालकांची चिंता वाढविणारा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागाच्या नवीन परिपत्रकानुसार, आता अकरावीच्या प्रवेशासाठी आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ग्राह्य धरताना, पहिल्या पाच विषयांचे गुण ग्राह्य धरण्यात येतील. यासंबंधित निर्देश उपसंचालकांना दिले असून, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संगितले जात आहे. मात्र, याचा फटका आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे.

मुळातच सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाची गुणपद्धती ही राज्य मंडळापेक्षा वेगळी आहे. त्यातही राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण कमी केल्याचा फटका विद्यार्थ्यांना निकालाच्या रूपात बसला आहेच, शिवाय इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत गुणांत होणारी पीछेहाट, यामुळे अकरावी प्रवेशदरम्यानही त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील ६ विषयांपैकी सरासरीसाठी ५ सर्वोत्तम विषयांतील गुण ग्राह्य धरले जात होते. आता त्याऐवजी फक्त पहिल्या ५ विषयांतील गुण सरासरीसाठी ग्राह्य धरले जातील. यासंबंधित आवश्यक निर्देश शिक्षण विभागाच्या सहसचिव सुवर्ण खरात यांनी १९ जून रोजी जारी करण्यात आले आहेत.

अकरावी प्रवेश निश्चित करू इच्छिणाऱ्या कोणत्याही मंडळाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान न होता, सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

निकालाचा टक्का नव्याने घसरला
परिपत्रकातील नवीन बदलामुळे आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनाही चांगले महाविद्यालय मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत असणाºया सहा विषयांपैकी एक विषय हा विशेष विषय असून, काहींना त्यात सर्वोत्तम गुण प्राप्त आहेत. मात्र, नवीन बदलामुळे पहिल्या पाचच विषयांचे गुण ग्राह्य धरण्यात येणार असल्याने, आपल्याला उत्तम गुण असणारे विषय क्रमनिहाय सहाव्या क्रमांकावर गेल्याने त्यांची निकालाची टक्केवारी घसरत आहे. याचा फटका त्यांना अकरावीच्या प्रवेशाच्या वेळी होणार असल्याची माहिती उपसंचालक कार्यालयात आलेल्या विद्यार्थी, पालकांनी दिली.

अर्जात करावा लागणार बदल
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या आॅनलाइन पद्धतीमधील आयसीएसईच्या अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात अर्ज दाखल करताना, विद्यार्र्थ्यांनी ‘बेस्ट आॅफ फाइव्ह’ गुणांची नोंदणी केली, तसेच बुधवारी आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, अनेक विद्यार्थ्यांनी दुसºया टप्प्यातही ‘बेस्ट आॅफ फाइव्ह’ गुणांची नोंद केली. मात्र, आता ज्या विद्यार्र्थ्यांनी पहिल्या, तसेच दुसºया टप्प्यामध्ये ‘बेस्ट आॅफ फाइव्ह’प्रमाणे अर्ज भरले आहेत, त्यांना आपल्या शाळेत जाऊन आधीच्या गुणांमध्ये बदल करून, गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांच्या गुणांची नोंद करावी लागणार आहे.

Web Title: First Five Instead Of The Best Five; A new change of school education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.